पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट १० तास राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 13:46 IST2022-08-29T13:45:37+5:302022-08-29T13:46:21+5:30

पर्यायी मार्गाचा वापर करण्याची रेल्वे प्रशासनाची सूचना

The railway gate between Neera-Walha on the Pune Pandharpur Palkhi route will remain closed for 10 hours | पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट १० तास राहणार बंद

पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट १० तास राहणार बंद

नीरापुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट मंगळवार दि.३० रोजी दिवसभर वाहतुकीसाठी १० तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. या दरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट  रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी मंगळवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ०८ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने फ्लेक्स बोर्ड द्वारे दिली आहे. सोमवारी सकाळी हे फ्लेक्स बोर्ड या रेल्वे गेटवर लावण्यात आले आहेत. काल रविवारी रात्री उशिरापर्यंत नीरा रेल्वे स्टेशन व रेल्वे पोलीसांकडे य बाबबत विचारता केली असता असे.कोमतेच नियोजन नसल्याचे सांगण्यात आले होते. 

या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव - जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Web Title: The railway gate between Neera-Walha on the Pune Pandharpur Palkhi route will remain closed for 10 hours