पुणे : कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेतही 'पुरुषी' मानसिकता आड येत असून, महिलांचे प्रमाण पाहता पुरुषाची नसबंदी अर्थात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली आहे. मागच्या तीन वर्षांत २४ हजार ८०१ महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान, याच तीन वर्षांत केवळ ७१५ पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया झाली आहे. सरासरी ४० महिलांमागे एका पुरुषाने नसबंदी करून घेत आहे.
दिवसेंदिवस लोकसंख्या भरमसाठ वाढ होत आहे. यामुळे वाढती लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी दरवर्षी शासनाकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची मोहीम राबवते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येते. या मोहिमेंतर्गत महिलांबरोबर पुरुषांमध्येही नसबंदीची जनजागृती करण्यासाठी आरोग्य कर्मचारी प्रयत्नशील असतात. परंतु नसबंदी करण्यात पुरुषाचे प्रमाण महिलांपेक्षा कमी आहे. गेल्या काही वर्षांत पुरुषी मानसिकतेत काही प्रमाणात बदल होत आहे. तरीही यामध्ये महिलांपासून पुरुष मागे आहेत.
२०२१-२२ मध्ये केवळ ९९ पुरुषांची नसबंदी
२०२१-२२ मध्ये ६ हजार ४१२ महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतली. तर याच वर्षी केवळ ९९ पुरुषांची नसबंदी झाली आहे. आकडेवारी पाहता नसबंदी करण्याकडे पुरुषांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तर २०२२-२३ मध्ये ८ हजार १६५ महिलांनी शस्त्रक्रिया केली, तर पुरुषांची संख्या २५४ इतके होते. यावर्षी ७ हजार १६९ महिलांची तर केवळ ३४१ पुरुषांची नसबंदी झाली आहे.
प्रमाण कमी असले तरी दिलासादायक
गेल्या तीन वर्षांतील पुरुषांची आकडेवारी पाहता दिलासादायक आहे. पुरुष नसंबदीचे प्रमाण गेल्या तीन वर्षांपूर्वी केवळ ९९ इतके होते. त्यानंतर २०२१-२२ मध्ये यामध्ये वाढ होऊन २५४ इतके पुरुषांनी नसबंदी करून घेतली, तर एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात पुणे शहरातील ३४१ पुरुषांनी नसबंदी केली आहे.
नसबंदीबद्दल पुरुषांमध्ये खूप गैरसमज आहेत. नसबंदीमुळे त्यांचं पुरुषत्व धोक्यात येईल, असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात तसे नसते. टाक्या न पडता, अत्यंत कमी वेळात सुरक्षितपणे शस्त्रक्रिया पार पाडते. त्यामुळे पुरुषांनी मानसिकता बदलून यात पुढाकर घेतला पाहिजे. -राजेेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा
अशी आहे आकडेवारी
वर्ष शस्त्रक्रिया केलेल्या महिलांची संख्या
२०२१ - २२ ६४१२२०२२ - २३ ८१६५२०२३ - २४ १०२२४