शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

Navale Bridge | 'PMC ने सर्विस रोड करण्याची गरज...'; सुप्रिया सुळेंची अपघातस्थळाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:37 PM

अपघात कमी होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंनी सुचवल्या सूचना..

पुणे : रविवारी नवले पूल परिसरात भीषण अपघात झाला. जवळपास पन्नास गाड्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला होता, असं सांगितलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघात झालेल्या घटनास्थळाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या, या नवले ब्रीजवरील वाहतूक कोंडी आणि येथे होणाऱ्या अपघातांबद्दल 2021 साली लोकसभेत प्रश्न मांडला होता. त्यावेळी नितीन गडकरी यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत काही बदल केले होते.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाले, पुणे महापालिकेकडून याठिकाणी सर्विस रोड करण्याची गरज आहे. NHAI ला विनंती आहे की, तज्ज्ञांना घेऊन इथल्या उतार कमी कसा करता येईल ते पाहावे. रोड सेफ्टीवर लक्ष दिले पाहिजे. आधीपेक्षा अपघात कमी जरी झाले असले ते आपल्याला शुन्यावर आणले पाहिजेत. गाडीच्या वेगामुळेही जास्त अपघात होत आहेत. सर्विस रोड, चांगले फुटफाथ आणि रोड सेफ्टीबद्दल लोकांना जागरूक करणे महत्त्वाचे आहे. 

राज्यपालांच्या वक्तव्यावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राज्याचे राज्यपाल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यांच्यावर टीका करणे ही आपली संस्कृती नाही. पण वारंवार राज्यातील महापुरषांबद्दल चुकीची वक्तव्य केली जातात हे दुर्दैवी आहे. राष्ट्रपतींना माझी विनंती आहे की, अशा चुका पुन्हा-पुन्हा होत आहेत याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पदाला न शोभणारी वक्तव्य राज्यपालांनी किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करू नये.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNitin Gadkariनितीन गडकरीNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणAccidentअपघात