शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

Microsoft सेवा विस्कळीत! काही विमान कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद; पुण्यात विमान रद्द नाही, उड्डाणे उशीरा

By नितीश गोवंडे | Updated: July 19, 2024 16:36 IST

अचानक निर्माण झालेल्या समस्येनंतरही पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही, उड्डाणे उशिरा सुरु

पुणे : जगभरातील कॉम्प्युटर आणि लॅपटॉप ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) शुक्रवारी बळी पडल्या. मायक्रोसॉफ्ट विंडोज वर चालणारे अनेक कॉम्प्युटर आणि लॅपटॉप अचानक क्रॅश झाले. याचा परिणाम काही विमान कंपन्यांवर देखील झाला. कंपन्यांच्या ऑनलाईन सेवा बंद  झाल्या, मात्र अचानक निर्माण झालेल्या समस्येनंतरही पुणेविमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही. काही विमानांची उड्डाणे मात्र १० ते ४० मिनिटे उशीराने होत होती.

मायक्रोसॉफ्टच्या वतीने अझुरे क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ या सेवांमध्ये समस्या आल्या आहेत, असे सांगण्यात आले. तसेच, कंपनीच्यावतीने आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीम्सना समाविष्ट केले आहे. या मागचे कारण देखील आम्ही निश्चित केले आहे, असे सांगण्यात आले. तसेच या समस्येचे स्वत:हून निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक सूचना येण्याची वाट पाहा. आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच तुम्हाला अपडेट मिळेल असे देखील सांगण्यात आले. आयटी कंपन्यांसह देशातील मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, अ‍ॅमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवर त्याचा परिणाम झाला.

शहरातील विमान उड्डाणे उशीराने..

पुणे शहरातून दिवसा विमानांची ये-जा कमी असते. अचानक मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झाल्याने इंडिगो, स्पाईसजेट, अकासा आणि विस्तारा या विमान कंपन्यांचे ऑनलाईन बुकिंग आणि वेब चेक इन बंद झाले. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर जाऊनच चेक इन करावे लागले. यासाठी संबंधित विमान कंपन्यांकडून अधिकचे मनुष्यबळ देखील पुरवण्यात आले होते. दिल्ली, मुंबई, गोवा यासह दुबई व अन्य देशातील विमान सेवेवर याचा मोठा परिणाम झाला असला तरी पुण्यातून मात्र एकही विमान रद्द करण्यात आले नव्हते. तरी संबंधित विमान कंपन्यांकडून देखील  आमच्या सिस्टीम प्रभावित झाल्या असून, समस्येचे निराकरण झाल्यावर तुम्हाला कळवू, आम्ही तुमच्या संयमाची प्रशंसा करतो असे सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आले.

या विमानांची उड्डाणे उशीराने..

अ.क्र. कुठून-कुठे -            विमान कंपनी                     उड्डाणांची नियोजित वेळ                  उशीराने केलेले उड्डाण१) पुणे ते हैदराबाद               इंडिगो                                     १२:३५                                                  ०१:२५२) पुणे ते रायपूर                 इंडिगो                                       १२:५५                                                 ०१:४४३) पुणे ते दिल्ली -               विस्तारा -                                    ११:१५                                                  ११:२९४) पुणे ते हैदराबाद -           इंडिगो -                                     ११:०५                                                  ११:२९५) पुणे ते गोवा -              स्पाईसजेट                                     १२:३०                                                   ०४:२०६) पुणे ते जोधपूर -             इंडिगो                                        ११:४५                                                  १२:२८७) पुणे ते कलकत्ता -         आकासा                                       ०१:०५                                                  ०२:१८८) पुणे ते बडोदा -             इंडिगो                                          ०१:४५                                                 ०२:२६९) पुणे ते गोवा -                इंडिगो                                          १२:२५                                                 ०४:३०यासह अन्य विमाने देखील तांत्रिक कारणास्तव उशीराने उड्डाण घेत होती.

पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाहीआजच्या डिजीटल युगात कधीतरी अशी घटना घडते, त्यापैकी ही घटना आहे. समस्या निर्माण होताच जगभरातील सगळ्याच नामांकित एजन्सी यामध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. मायक्रोसॉफ्टच्या ग्राहकांसह विमानाद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल असे नियोजन करण्यात आले, ही प्रशंसनीय बाब आहे. पुणे विमानतळावरून एकही विमान रद्द झाले नाही हे देखील कौतुकास्पद आहे. विमानतळावर अशा घटनेची शक्यता गृहीत धरून नेहमी एक पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. जेणेकरून प्रवाशांना कमीत कमी असुविधा होईल. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणेmicrosoft windowsमायक्रोसॉफ्ट विंडोairplaneविमानpune airportपुणे विमानतळpassengerप्रवासीSocial Mediaसोशल मीडिया