शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा प्रवास आनंददायी, पोटातलं पाणीही हललं नाही..!  

By श्रीकिशन काळे | Updated: December 27, 2024 18:40 IST

महामेट्रोचा प्रवास मात्र दिव्यांगांसाठी अतिशय सहज आणि सोपा झाला आहे. कुठेही कसलीच अडचण येत नाही.

पुणे : मेट्रोमधून प्रवास करायची माझी खूप इच्छा होती. ती इतक्या सहज, सुंदररीत्या होईल, असं वाटलंच नव्हतं. मी व्हीलचेअरवर असल्याने हा प्रवास कसा होईल ? याबाबत साशंक होते. पण, मंडई मेट्रो स्थानकात गेले आणि सुरुवातीपासून मला तिथल्या कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे मी मेट्रोत बसून छान प्रवास केला. पोटातले पाणी देखील हललं नाही, इतका सहजरीत्या प्रवासाचा आनंद मेट्रोने दिला’, अशा भावना पॅरा ऑलिम्पिक स्वीमर तृप्ती चोरडिया हिने व्यक्त केल्या.

शहरामध्ये वाहतूक कोंडी प्रचंड वाढली असल्याने प्रवास करणे कठीण आणि अवघड झाले आहे. त्यातही एका व्हीलचेअरवर असणाऱ्या व्यक्तीस तर त्याहून कठीण होऊन बसते. पण, महामेट्रोचा प्रवास मात्र दिव्यांगांसाठी अतिशय सहज आणि सोपा झाला आहे. कुठेही कसलीच अडचण येत नाही. एकटे देखील मेट्रोमध्ये जाऊन प्रवास करू शकतात. त्याचाच अनुभव तृप्ती चोरडिया हिने घेतला.

तृप्ती म्हणाली, खूप दिवसांपासून मला मेट्रोमधून प्रवास करायचा होता. त्यामुळे मी रिक्षात बसून स्वारगेट मेट्रो स्थानकाकडे गेले. पण, तिथे पार्किंगची अडचण असल्याने मी मंडई मेट्रो स्थानकाकडे गेले. तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आत गेले की, लगेच तिथले कर्मचारी माझ्याकडे आले. त्यांनी मला तिकीट कसे काढायचे ? कुठून कसे जायचे ? याविषयी माहिती दिली. माझ्यासोबत तिथल्या कर्मचाऱ्यांनी येऊन मेट्रोमध्ये बसवले. मेट्रोमध्ये जाताना कुठेही कसलाच अडथळा आला नाही. मी पिंपरीकडे जाणाऱ्या मेट्रोत बसले. कर्मचाऱ्यांनी मला एका ठिकाणी व्हीलचेअर लॉक करून ठेवायला सांगितले आणि खांबाला पकडले. मेट्रो सुरू झाल्यावर माझी व्हीलचेअर इकडे-तिकडे हलेल असं वाटलं होतं. पण, व्हीलचेअर अजिबात हलली नाही आणि इतकंच नव्हे तर पोटातील पाणी देखील हललं नाही. त्यामुळे एवढा छान प्रवास झाला की, माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मग पिंपरीत उतरले आणि तिथून परत येण्यासाठी तिकीट काढले आणि मेट्रोत बसले. पहिल्यांदा मेट्रोतून वरून शहर पाहत होते. सर्वत्र इमारती, झाडांची हिरवळ पाहायला खूप मजा आली.

दिव्यांग किंवा ज्येष्ठांना अतिशय चांगली सोय मेट्रोने केली आहे. त्यामुळे मला प्रवास करताना खूप आनंद झाला. शहरात प्रवास करताना खूप त्रास होतो. पण, मेट्रोमध्ये काहीच अडथळा आला नाही. - तृप्ती चोरडिया, पॅरा ऑलिम्पिक स्वीमर 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रSwimmingपोहणेMetroमेट्रोTravel Tipsट्रॅव्हल टिप्सpassengerप्रवासीTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस