शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 22:56 IST

 या दरम्यान सर्व  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या  ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क बावडा : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरहून (दि. 30 जून ) निघाला व विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड,वकीलवस्ती, बावडा या गावाहून सायंकाळी इंदापूर ते सराटी 25 किमी प्रवास करून पुणे जिल्हातील  शेवटच्या मुक्कामासाठी  निरा नदी किनारी वसलेल्या सराटी (ता. इंदापूर जि.पुणे ) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत  विसवला. या दरम्यान सर्व  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या  ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला.सराटी गावात पालखी सोहळा आल्यानंतर  गावाच्या ईशीवर  गावातील ग्रामस्थ रथातुन पालखी खांद्यावर घेऊन मुक्काम  स्थळापर्यंत टाळ मृदुंगाच्या निनादांमध्ये  आणल्यानंतर  सर्व दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी, तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, पखवाजवादक, चोपदार टाळकरी तसेच  पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,हनुमंत कोकाटे,उपसरपंच संतोष कोकाटे, सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी, काकासाहेब जगदाळे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, ज्ञानदेव कोकाटे,बापूसाहेब कोकाटे,विक्रम कोकाटे, रघुनाथ कोकाटे,बाबासाहेब कोकाटे, राजेंद्र कुरळे, सुरेश कोकाटे, अतुल भोसले,संत तुकाराम महाराज पालखी  सोहळा  अध्यक्ष जालिंदर मोरे, सोहळा प्रमुख दिलीप मोरे, वैभव मोरे,गणेश मोरे, विश्वस्त विक्रम मोरे,नंदकुमार मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर, पुरुषोत्तम  मोरे व इतर विश्वस्त,इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सराटी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी महाआरती संपन्न झाली.

सराटी येथे पालखी मुक्काम स्थळी थांबल्यानंतर नीरा नदीच्या किनारालगत असणाऱ्या गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.पालखीच्या मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी जर्मन तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पाऊस वाऱ्यापासून भाविकांचे संरक्षण होणार आहे.पालखी मुक्काम स्थळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेvarkariवारकरीPandharpurपंढरपूर