शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

HSC Board Exam: पेपर अवघड गेल्यानं उचललं टोकाचं पाऊल; बारावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 20:43 IST

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बारावीची परीक्षा देत असलेल्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बारावीची परीक्षा देत असलेल्या एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. एक पेपर अवघड गेल्याने तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना गुरुवारी (दि १०) घडली असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पायल रंगनाथ गुंडाळ (वय १७, रा. जकाते वस्ती शिक्रापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी रंगनाथ चिमणराव गुंडाळ (वय ५८, रा. जकाते वस्ती शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

 पायल गुंडाळ व साक्षी गुंडाळ या दोघी बहिणी दुपारच्या सुमारास घरामध्ये अभ्यास करत होत्या. यावेळी साक्षी ही दुसऱ्या खोलीत गेली. पायल ही एकटीच घरात अभ्यास करत बसली होती. मात्र काही वेळाने पायल हीला आवाज देऊन देखील पायलने दरवाजा उघडला नाही. साक्षीने तिचे वडील रंगनाथ गुंजाळ यांना आवाज देऊन पायल दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वांनी आवाज देऊन देखील पायल ने दरवाजा उघडला नाही म्हणून तिच्या वडिलांनी दरवाजा तोडून रूम मध्ये जाऊन पाहिले असता पायलने ओढणीच्या सहाय्याने घरात गळफास घेतल्याचे दिसले.  या घटनेची माहिती मिळतात शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे, पोलीस नाईक अमोल नलगे, नवनाथ दांगडे यांनी घटनास्थळी आले. त्यांनी जात पंचनामा केला. पोलीसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील मिळून आली आहे. बारावीचे पेपर सुरू असताना पेपर अवघड गेल्याने पायल हिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाPuneपुणेPoliceपोलिसDeathमृत्यूEducationशिक्षण