शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वेटरने बिल मागितलं म्हणून केले त्याचे अपहरण; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:29 IST

भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वेटरने बिल मागितलं, म्हणून त्याला बेदम मारहाण करून त्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.  याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

योगेश सर्जेरावर पारधे (वय २८ अहमदनगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय ४१), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय ३२), नितीन अशोक वाडेकर (वय ३२ रासदर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शारदा निलेश भिलारे (वय ३८ भिलारेवाडी कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपहरण करणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर याआधी ३०२, ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यांना जेजुरी जवळील दोरगेवाडी डोंगरातून पाठलाग करून पकडले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारे यांचे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ रानमाळ हॉटेल आहे. आरोपी पारधे, कानडे, वाडेकर, बेंद्रे हॉटेलमध्ये  जेवण करण्यासाठी आले होते. आरोपींनी जेवण केल्यानंतर हॉटेलमधील कामगार किशोर कोईराला याने त्यांच्याकडे बिल मागितले. त्यानंतर आरोपींनी कोईराला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी भिलारे यांना धमकावले. उद्या तुम्ही या मरणाची खबर ऐकाल, अशी धमकी आरोपींनी दिली. कोईरालाला धमकावून आरोपींनी मोटारीत बसवले. त्यानंतर आरोपी त्याला घेऊन पसार झाले. काही अंतरावर त्याला सोडून त्याला आरोपी पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर भिलारे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, पोलिस कर्मचारी विक्रम सावंत व निलेश खैरमोडे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, अपहरण करणारे आरोपी जेजुरी जवळील दोरगेवाडी येथील डोंगरात आरोपी लपून बसले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, धिरज गुप्ता कर्मचारी रविंद्र चिप्पा, गणेश गुप्ता, तुळशीराम टेंभुर्णे, सचिन गाडे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईhighwayमहामार्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhotelहॉटेल