शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

शरद पवारांच्या सोबतीने राजकारणाचा प्रवास सुरू झाला अन् उलगडले त्यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 14:07 IST

विविध निवडणुकांमधील अनुभव, कॉलेज युवकापासून ज्येष्ठ नेत्यापर्यंतचा प्रवास अशा विविध आठवणींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे उलगडत गेले

पुणे : महाविद्यालयीन काळातील मजेदार गंमती, विविध निवडणुकांमधील अनुभव, कॉलेज युवकापासून ज्येष्ठ नेत्यापर्यंतचा प्रवास अशा विविध आठवणींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाेबतचे मैत्रीचे धागे उलगडत गेले. निमित्त होते, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शारदोत्सवात 'मैत्र जीवांचे'- शरद पवार यांच्याबरोबरच्या अतुट मैत्रीचे अनोखे किस्से या कार्यक्रमाचे.

माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील, उद्योगपती विठ्ठल मणियार, संभाजी पाटील (कर्नल), मधुकर भावे आणि बारामतीचे जवाहर वाघोलीकर यांनी यात मैत्रीला उजाळा दिला.

श्रीनिवास पाटील म्हणाले की, कॉलेज जीवनापासून शरद पवार यांच्या सोबतीने राजकारणाचा प्रवास सुरू झाला. पवार यांच्या नेतृृत्वाची चुणूक ते बीएमसीसीमध्ये असतानाच आम्हा मित्रमंडळींना आली होती. १९६१ साली चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाच्यावेळी शरद पवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी आपण काहीतरी केले पाहिजे, या भावनेतून निषेध मोर्चा काढला.

५ ते ६ हजार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा निषेध मोर्चा शनिवार वाडा येथे झालेल्या समारोपप्रसंगी पंचवीस हजारांपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्या निषेध सभेत पवार यांचे भाषण ऐकून बॅरिस्टर गाडगीळ यांनी महाराष्ट्र पवार यांच्या हातात सुजलाम्, सुफलाम् आणि सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला. वेदनेचे संवेदनेत रूपांतर करणारा आणि सामाजिक भान बाळगणारा मित्र हा आमचा नेता आहे.जवाहर वाघोलीकर म्हणाले की, पवार यांच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी मी त्यांच्या सोबत होतो. मतदारांच्या स्लीपा लिहिण्यापासून रात्री-बेरात्री खेडीपाडी पिंजून काढून आम्ही प्रचार केला आणि त्यांना निवडून आणले.

कर्नल संभाजी पाटील म्हणाले की, शरद पवार हे माणुसकी आणि मैत्री जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिस्त हा गुण इतर गुणांचे अधिष्ठान आहे. सैनिकांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या अनेक अडचणी त्यांनी चुटकीसरशी सोडवल्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे.

विठ्ठल मणियार म्हणाले की, विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक मी पवार यांच्या विरोधात लढलो होतो आणि मी ती हारलो होतो. त्यांच्या विरोधात लढून हारण्यात देखील मजा असते, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्या निवडणुकीपासून मी त्यांच्याच गोटातला झालो.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणcollegeमहाविद्यालयSocialसामाजिक