शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 21:22 IST

बनाव करून केलेल्या खुनाची पौड पोलिसांकडून शिताफीने उकल

पौड : कासार आंबोली ता.मुळशी येथील प्रियंका क्षेत्रे हिला तिचाच पती स्वप्नील बिभीषण सावंत याने घातक औषधे देऊ ठार केले.  ती आजारी असल्याचे भासवून तिला एका खाजगी रुग्णालयात देखील दाखल केले. परंतु ती दाखल करण्याअगोदरच मयत असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालय पौड येथे हलविण्यास सांगितले. पौड येथील  वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रियंका मयत असल्याची तक्रार पौड पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. स्वप्नीलने आपली पत्नी आजारी असल्याने व उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक खोटी माहिती पौड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांतर १५ नोव्हेबर रोजी प्रियंकाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद पौड पोलीस स्टेशनला करण्यात आली. परंतु त्यानंतर प्रियंकाच्या नातेवाईकांनी स्वप्नील हा तिचा छळ करीत असून त्यानेच तिचा खून केला असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. पौड पोलीसांनी त्या दृष्टीने तपास केल्यानतर प्रियंकाच्या खऱ्या मृत्यूचे कारण शोधण्यात पोलीसांना यश आले. 

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची अधिक माहिती अशी कि, मुळचा सांगवी ता.आस्ठी जि.बीड येथील असलेल्या स्वप्नील बरोबर प्रियंका हिचा मागील पाच महिन्यापूर्वीच प्रेम विवाह झाला होता. त्यांतर तो प्रियंकाला घेवून कासार आंबोली येथे राहण्यास आला होता. व घोटावडे फाटा येथे एका खाजगी रुग्णालयात नौकरीस लागला होता. या दरम्यान त्याची रुग्णालयातीलच परिचारिका असलेल्या प्रियंका पटेल हिच्याबरोबर सुत जुळले होते. त्याला तिच्याबरोबर दुसरा विवाह करायचा होता. त्यामुळे त्याने अत्यंत बुद्धिमानपणे रुग्णालयातील औषध घरी आणून तिला जीवे मारण्याच्या हेतूने भुलीच्या औषधाबरोबरच शुगर कमी करण्याची व रक्तदाब कमी करण्याची औषधे प्रियंका क्षेत्रे हिला देवून तिचा खून केला होता. पौड पोलिसांच्या टीमने अथक प्रयत्नाने या खुनाची उकल केली. त्याबाबतची कबुली स्वप्नीलने दिली आहे. त्यांतर त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील सावंत  याला अटक करण्यात आली असल्याची माहिती फौजदार श्रीकांत जाधव यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीArrestअटक