शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

महाराष्ट्रातील सर्वात माेठी तालीम पुण्यात; आखाड्यात एकाच वेळी खेळू शकतात १०० कुस्तिपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 00:21 IST

पुण्यातील कात्रज भागात सहा ते सात एकरांत ही तालीम असून मातीचा आखाडा हा शंभर फुटांहून माेठा आहे

तन्मय ठाेंबरे

पुणे : कुस्तीची तालीम म्हटले की आपल्या डाेळयांसमाेर येते पंधरा बाय पंधरा किंवा वीस फुटाचा मातीचा आखाडा. मात्र, कात्रज येथे एक अशी तालीम आहे जिचा विस्तार सहा ते सात एकरांत आहे तर मातीचा आखाडा हा शंभर फुटांहून माेठा आहे. मामासाहेब माेहाेळ तालीम ही पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात माेठी तालीम असून अनेकांना हे माहीत देखील नाही. या तालमीने नामांकित कुस्तीगीर घडवले आहेत. 

कुस्ती हा लाल मातीतला खेळ आहे. या खेळाची मजाच काही और आहे. या आगळया वेगळया खेळाविषयी प्रचार प्रसार करण्यासाठी दरवषी २३ मे हा ‘जागतिक कुस्ती दिन’ म्हणून पाळला जाताे. सध्या कुस्ती या खेळाला ग्लॅमर आलेले आहे. अनेक मुले लहानपणापासून इतर खेळाबराेबरच या खेळाकडेही वळत आहेत.  

मामासाहेब माेहाेळ ही महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघटनेची सन २००० पासूनची एकमेव तालीम आहे. येथे काेकण, विदर्भ, भाेर, मुळशी यासह संपूर्ण महाराष्ट्रातून दीडशे मुले कुस्तीचे धडे गिरवतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण, अगदी तीन ते चार वषार्चे छाेटे वस्ताद येथे निवासी राहून शिकतात. परंतू त्यांच्यासाेबत पालक हवा असताे. तर सात वर्षाच्या पुढील मुले एकटे राहून शिकतात. येथे माती तसेच मॅट या दाेन्ही प्रकारातील कुस्ती खेळता येते.  एकाच वेळी येथे शंभर कुस्तीपटू खेळू शकतात हे विशेष. 

या तालमीने घडवले हिंदकेसरी कुस्तीपटू 

या तालमीने राेहित पटेल, अक्षय शिंदे, सुरज निकम हे तीन हिंदकेसरी कुस्तीपटू घडवलेले आहेत. याचबराेबर अमाेल बुचडे, याेगश दाेडके, सययद चाउस , विजय चाैधरी, हे नामांकित कुस्तीपटू देखील या तालमीतून घडलेले आहेत. येथे राहण्यासाठी शंभर रूम आहे. एका रूममध्ये तिघे चाैघे राहू शकतात. दिवसाआड मॅट व माती यावर प्रॅक्टिस घेण्यात येते. येथे १३ पेक्षा जास्त वयाेगटातील मुलांची संख्या जास्त आहे. सकाळी पाच वाजता उठल्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस करण्यात येते. पुढेही टप्प्याटप्प्याने प्रॅक्टिस करण्यात येते.

''कुस्ती हा खेळ नसून संस्कृती आहे. हा मातीतला खेळ आहे. ऑलिंपिक ला अनेक कुस्तिपटूंनी मेडल पटकावले आहेत. तसेच कुस्तीवर अनेक चित्रपटही येउन गेले. तालमीत संस्कार वेगळे असतात. या कारणांमुळे आता कुस्तीकडे कल खूप वाढला आहे व त्याची आवडही वाढली आहे. कुस्ती वाढली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहाेत. ज्याप्रमाणे मॅटची कुस्ती वाढली आहे. त्याप्रमाणे मातीची कुस्ती देखील वाढली पाहिजे. आपली लाल मातीची कुस्ती ऑलिंपिकला गेली पाहिजे. परदेशातील बीच रेस्लिंग ऑलिंपिकमध्ये आणण्यासाठी इतर देशांचे प्रयत्न सूरू आहेत. त्याप्रमाणे आपली लाल मातीवरील कुस्ती तेथे घेउन जाण्याचा आमचा प्रयत्न सूरू असल्याचे मामासाहेब माेहाेळ तालीमचे वस्ताद (प्रशिक्षक) पंकज हरगुडे यांनी सांगितले. ''

टॅग्स :katrajकात्रजWrestlingकुस्तीSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र