शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Muncipal Election: महापालिकेचा बिगुल वाजवण्यावर महायुतीत खलबते; एकत्र लढणार की स्वतंत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:13 IST

युतीमधील तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना स्वतंत्रपणे लढायचे आहे, मात्र याबाबतीतील निर्णय वरिष्ठ घेतील असे ते सांगतात

पुणे : लोकसभा झाली, विधानसभा झाली आता महापालिकेचा बिगुल एकत्र वाजवायचा की स्वतंत्र यावर महायुतीमध्ये खलबते सुरू आहेत. युतीमधील तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना स्वतंत्रपणे लढायचे आहे. मात्र, याबाबतीतील निर्णय वरिष्ठ घेतील असे ते सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर अशी घोषणाच केली आहे. भारतीय जनता पक्षाने अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही तर युतीमध्ये असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत.

पाच वर्षांत काय घडले?

पुणे महापालिकेत वर्ष २०१७ ते वर्ष २०२२ या पंचवार्षिकमध्ये भाजपची सत्ता होती. त्यांचे ९८ नगरसेवक निवडून आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही याच काळात भाजपचीच सत्ता होती. दोन्ही महापालिका ताब्यात असल्याने मागील २ वर्षे निवडणूक झाली नाही तरीही या दोन्ही महापालिकांवर पुन्हा झेंडा फडकावण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आतूर झाले आहेत. २०१७ पूर्वी या पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्रित) व काँग्रेस यांची सत्ता होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व दोन्ही ठिकाणी होते. २०१७ मध्ये भाजपने ते मोडून काढले. दोन्ही ठिकाणांहून अजित पवार समर्थकांना पायउतार व्हावे लागले. त्याची खंत अजित पवार यांच्यासह त्यांचे दोन्ही महापालिकांमधील समर्थक बाळगून आहेत.

जागावाटपासाठी लागणार भाजप-राष्ट्रवादीत चुरस

आता राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार भाजपबरोबर युती करून राज्यात नव्याने सत्तेवर आले आहेत. उपमुख्यमंत्रिपद त्यांच्याकडेच आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही तेच घेतील, असे दिसत आहे. विधानसभेसाठी त्यांनी कमी जागा घेतल्या. मात्र, आता महापालिकेसाठी ते तशीच भूमिका घेतील असे नाही. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांच्यात दोन्ही महापालिकांसाठी एकत्र असले तरीही व वेगवेगळे लढले तरीही मोठीच चुरस होईल असे चित्र सध्या तरी आहे. एकत्र राहिले तर अजित पवार गटाला भाजपचा वरचष्मा सहन करावा लागेल. जागावाटपात ते कमी जागा देतील, अशी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

निवडणुकीचा मार्ग मोकळा

महापालिकेची निवडणूक जनगणना व राखीव जागा या मुद्यांवर रखडली आहे. मात्र, त्यावर तोडगा काढणे नव्या सरकारला शक्य आहे. उच्च न्यायालयात त्यांनी सरकारची भूमिका जाहीर केली, तर यावर निकाल लागून महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, असे बोलले जाते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच देवेंद्र फडणवीस यांनी आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे जाहीर वक्तव्य केले होते. त्याच्या थोडेच दिवस आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा विधानसभा एकत्रित लढली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्था मात्र स्वबळावर अशी घोषणा केली होती. विधानसभेत मिळालेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून ते याच धोरणाशी कायम राहतील, असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राज्यातील नव्या सरकारमध्ये आता हेच दोन्ही नेते सत्तेवर असल्याने आता महापालिका निवडणूक घेण्यामध्ये तरी काही अडथळा राहिलेला नाही असे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत आहे.

प्रभागरचनेचा वाद

महापालिकेचा प्रभाग (वॉर्ड) तीन नगरसेवकांचा की चार हाही वाद आहे. भाजपचा आग्रह चारचा प्रभाग असा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तसा ठरावच विधानसभेत केला होता व त्याच पद्धतीने निवडणूक घेतल्यामुळे बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आली. त्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवार यांनी चारच्या प्रभागाला विरोध केला. भाजपला वगळून झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांच्या आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिला ठराव महापालिका निवडणुकीसाठीचा चारचा प्रभाग बदलून तो तीनचा केला होता. त्यानंतर अडीच वर्षांनी महायुती होऊन भाजप सत्तेत आल्यानंतर पुन्हा चारचा प्रभाग करण्यात आला. नव्या महायुती सरकारमध्ये भाजपच प्रमुख घटक असल्याने आता एका प्रभागात चार नगरसेवक याप्रमाणेच निवडणूक होईल हे नक्की आहे.

युतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचाही समावेश आहे. जिल्ह्यातील पुरंदर विधानसभेत त्यांनी विजय मिळवला. मात्र, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका क्षेत्रात मूळ शिवसेनेतून मोजकेच नगरसेवक या गटात आले; पण तरीही त्यांनी संघटनात्मक बांधणी केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीत रस आहे. त्यामुळे हा गट भाजपबरोबर राहायला पसंती देईल असे चित्र आहे.

शहराध्यक्ष म्हणतात...

विसर्जित महापालिका सभागृहात आमचे १०० नगरसेवक होते. संघटनात्मक पातळीवर कधीही, कोणतीही निवडणूक झाली तरी आम्ही सज्ज असतो. महापालिका त्याला अपवाद नाही. युती करायची की स्वबळावर लढायचे याचा निर्णय वरिष्ठ घेतील. आमची कशालाही तयारी आहे.धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप, पुणे

शहरात आमचेही अस्तित्व मोठे

याबाबतचा अंतिम निर्णय आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असेल. ते निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही निवडणूक लढवू. शहरात आमचेही अस्तित्व मोठे आहे. त्यामुळे एकत्रित निवडणूक झाली, तर आम्हाला कमी जागा मिळतील, असे वाटत नाही.- दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार

वेगवेगळे लढलो तर चुकीचा संदेश 

युती कायम राहावी, असे आमचे मत आहे. विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान करून मतदारांनी युतीला पसंती दिली आहे. वेगवेगळे लढलो तर त्यातून मतदारांसमोर चुकीचा संदेश जाईल, तरीही याबाबत आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील.- नाना भानगिरे, शहराध्यक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे)

पुणे महापालिकेतील जागा

४२ प्रभाग : १६४ नगरसेवक

विसर्जित सभागृहात सत्ता : भारतीय जनता पक्ष

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जागा

३२ प्रभाग : १२८ नगरसेवक

विसर्जित सभागृहात सत्ता : भारतीय जनता पक्ष

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMuncipal Corporationनगर पालिकाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना