जनरल मॅनेजर तरुणीवर वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 13:47 IST2023-01-15T13:43:25+5:302023-01-15T13:47:04+5:30
सागर पाषाणकरसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल. 37 वर्षीय महिलेने दिली तक्रार.

जनरल मॅनेजर तरुणीवर वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती; चार जणांविरोधात गुन्हा दाखल
किरण शिंदे
पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर ऑटो शोरूममध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यास सांगितल्या प्रकरणी चार जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर 2021 ते जुलै 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी एका 37 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
सागर पाषाणकर (वय 47), रवी गारगोटे (वय 36) आणि प्रवीण रहाटे (वय 32) यांच्यासह एका 35 वर्षीय तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 509, 500, 506, 34 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी या शिवाजीनगर परिसरात असलेल्या पाषाणकर ऑटो शोरूममध्ये जनरल मॅनेजर या पदावर काम करतात. सागर पाषाणकर हे फिर्यादी तरुणीचे बॉस आहेत. सागर पाषाणकर आणि त्यांच्या मैत्रिणीने फिर्यादीला शरीर व्यवसाय करण्याबाबत बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न केली. तर इतर आरोपींनी फिर्यादींचा मानसिक छळ करून लैंगिक, आर्थिक व सामाजिक विटंबना केली. याशिवाय सागर पाषाणकर आणि आरोपी असलेल्या तरुणीने फिर्यादींना धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.