‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’ उदयनराजेंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:08 IST2025-04-11T11:06:53+5:302025-04-11T11:08:54+5:30

एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं,स्त्री शिक्षणाच्या उगमावर उदयनराजेंचा ऐतिहासिक संदर्भ

The elder Pratap Singh Maharaj started the first school for women's education; Udayanraje gave historical context | ‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’ उदयनराजेंचं वक्तव्य

‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’ उदयनराजेंचं वक्तव्य

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत उदयनराजे भोसले यांनी इतिहासातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला.

उदयनराजे म्हणाले, "एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं."



या ऐतिहासिक उल्लेखांबरोबरच, उदयनराजे भोसले यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रगतीबाबतही चिंता व्यक्त केली. "कदाचित तांत्रिक किंवा पर्यावरण विषयक अडचणी असतील, पण जर त्या ठिकाणी अडचण असेल, तर अरबी समुद्रालगत अठ्ठेचाळीस एकर जागा उपलब्ध आहे. एवढ्या मोठ्या जागेत स्मारक उभारता येईल," असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आणि इतर संबंधितांशी चर्चा केली असून, त्यांनी यावर स्पष्ट घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा सन्मान करताना सामाजिक सलोखा, स्त्री शिक्षण, आणि ऐतिहासिक स्मारकांच्या जपणुकीच्या गरजेवर भर देण्यात आला.

Web Title: The elder Pratap Singh Maharaj started the first school for women's education; Udayanraje gave historical context

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.