शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या कुटुंबाला कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी; विधानसभेत हिंजवडीच्या आगीची रासनेंनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:36 IST

गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का? याची पण शासनाने चौकशी करावी अशीही मागणी रासने यांनी केली

पुणे: हिंजवडीच्या व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल बसला आज सकाळी अचानक आग लागली होती. आगीत टेम्पो मधील ४ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. इतर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. चालकाच्या पायाखाली अचानक इंजिन आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणाची कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर हा मुद्दा उपस्थित केला. मृतांना कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. 

रासने म्हणाले, माननीय अध्यक्ष महोदय आज सकाळी साडेसात वाजता हिंजवडीत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मिनी बसला त्या गाडीच्या इंजिनला आग लागली.  आग लागली कशी हे बघण्याकरीता ड्राइव्हर खाली उतरल्यानंतर ती आग भडकली. आणि त्या आगीमध्ये बसमध्ये असणाऱ्या सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे, राजू चव्हाण या चार जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण सुखरूप बाहेर पडले. या कंपनीने ज्या ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांना कंपनीकडे शासनाने आदेश देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करून द्यावी. आणि ही जी गाडी होती या गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का? याची पण शासनाने चौकशी करावी. सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनानी दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी.

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीMLAआमदारVidhan Bhavanविधान भवनfireआगFire Brigadeअग्निशमन दल