Salon And Beauty Parlour Association: सामान्य माणूस महागाईने त्रस्त; राज्यात आता सलून अन् ब्यूटी पार्लरचेही दर वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:00 AM2022-04-20T11:00:56+5:302022-04-20T11:01:14+5:30

राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत निर्णय, 1 मे कामगार दिन पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार

The common man suffers from inflation The rates of salon and beauty parlor will also increase in the state | Salon And Beauty Parlour Association: सामान्य माणूस महागाईने त्रस्त; राज्यात आता सलून अन् ब्यूटी पार्लरचेही दर वाढणार

Salon And Beauty Parlour Association: सामान्य माणूस महागाईने त्रस्त; राज्यात आता सलून अन् ब्यूटी पार्लरचेही दर वाढणार

Next

पुणे : रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन, सोने चांदी याबरोबरच वस्तुंच्या किमतीतही लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. महागाईने सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यातच आता राज्यात सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी शहरी व ग्रामीण भागात 30% दरवाढीचा निर्णय ऑनलाईन बैठकीत घेतल आहे. 1 मे कामगार दिन पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सलून & ब्यूटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे. नागरीकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे असे अवाहनही त्यांनी केले आहे. 

काशीद म्हणाले, राज्यभरातून दरवाढ करण्यासाठी व्यावसायिकांची मागणी होत होती.  असोसिएशनचे 52000 सलून व ब्यूटी पार्लर चालक सदस्य आहेत. दररोजच्या विविध प्रकारचा वाढत्या महागाईमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील दरवाढीला सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

दरवाढीची प्रमुख कारणे

-  ब्युटी प्रॉडक्ट/पेट्रोल/गॅस सिलेंडर/खाद्यतेल/शाळांची फी या व सर्व प्रकारची वाढती दरवाढ

-  कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन नंतर व्यवसायामध्ये 50% ग्राहकांची झालेली कमी व वाढती बेरोजगारी

-  सरकारचे कायमच नाभिक समाज व सलून व ब्यूटी पार्लर व्यवसायिक यांच्या मागण्यांकडे सुरू असलेले दुर्लक्ष

Read in English

Web Title: The common man suffers from inflation The rates of salon and beauty parlor will also increase in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.