शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत दाहिनीचा फ्युज उडाल्याने मृतदेह अर्धवट जळाला; घाबरलेल्या कामगारासाठी वसंत मोरे आले धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 10:35 IST

वसंत मोरेंच्या एका फोनवर एका तासात मशीन दुरुस्त होऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले

पुणे : कात्रजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीच्या मशीनचे फ्युज उडाल्याने मृतदेह अर्धवट जळाला होता. अशा परिस्थितीत घाबरलेल्या कामगाराने मनसेचे नेते वसंत मोरे यांना फोन करून सांगितले. नेहमीप्रमाणे अँक्शन मोडमध्ये असणारे मोरे कामगाराच्या मदतीसाठी धावून आले. आणि त्याला नोकरी गमावण्यापासून वाचवले. वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करून हे सांगितले आहे.    मंगळवारी रात्री कात्रज स्मशाभूमीमध्ये विद्युत दाहिनीत एक मृतदेह अंत्यविधीसाठी सोडण्यात आला. पण त्यावेळी अचानक दाहिनीच्या मशीनचे फ्यूज उडाले. आणि मृतदेह अर्धवट जळाला होता. अशा वेळी त्याठिकाणी असणारा कामगार प्रचंड घाबरला होता. कारण मशीन खराब झाल्यानंतर २ तास होऊन गेले तरी दुरुस्त करणारा आला नाही. त्याने मी सकाळी येईल आता येऊ शकत नाही. असे सांगून हात वर केले होते. अशा परिस्थितीत घाबरलेल्या या कामगाराने रात्री ११.३० वाजता मोरे याना फोन लावला. आणि वरील सर्व काही प्रकरण सांगितले. त्यानंतर वसंत मोरे अँक्शन मोडमध्ये आले. आणि त्यांनी थेट ठेकेदार आणि मेंटेनन्स वाल्याना फोन लावला.  श्रीनिवास कंदुलसाहेब, दोन्हीही ठेकेदार यांना सांगितले, जर २ तासात मशीनमधील त्या मृदेहावर अंत्यसंस्कार पूर्ण झाले नाहीत. तर मी लाईव्ह येईल मग पुढे जे होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार. आणि पुढील एक तासात गॅस दाहिनी पूर्ववत झाली. पण तोपर्यंत एकही स्थानिक लोकप्रतिनिधी जागेवर आला नाही असो ही आहे माझी सोशल मीडिया पॉवर असल्याचे मोरे यांनी फेसबुक पोस्ट करून सांगितले आहे. 

कामगाराची नोकरी वाचली 

मशीन खराब झाल्यानंतर मृतदेह अर्धवट जळाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे नातेवाईक सावडण्यासाठी येणार होते. त्यानंतर या मुद्द्याचे भांडवल करणारे अनेक कार्यतत्पर कार्यकर्ते पत्रकार घेऊन आले असते.  ठेकेदारावर, मेंटेनन्स वाल्यावर कामगारांवर सर्वांवर कारवाईचा बडगा उगारला असता आणि त्यात ते लोक खुश झाले असते. त्यानंतर सर्वांसहित कामगारालाही नोकरी गमवावी लागली असल्याचे मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाkatrajकात्रजMNSमनसे