Pune : पानशेत धरणाजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 13:29 IST2022-10-13T13:13:54+5:302022-10-13T13:29:48+5:30
मार्गासनी ( पुणे ): वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत ...

Pune : पानशेत धरणाजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
मार्गासनी (पुणे): वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानशेत धरणाच्या बॅकवॉटरजवळ आंबेगाव येथील गट नंबर 142 मध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे.
मृत इसमाचे वय अंदाजे 30 ते 40 वर्षे असून अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्याचा टी-शर्ट, राखाडी कलरची फुल पॅन्ट घातलेला मृतदेह पूर्णपणे सडलेला अवस्थेत आढळला आहे. हातावर गोंदलेल्या खुणा दिसून येत आहेत, असंही पोलिसांनी सांगितले.
याबाबत कोणाला काही माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार (मोबाईल नं- 7350836100) वेल्हे पोलीस स्टेशन 02130- 221233 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.