पुरंदरच्या नीरा बाजार समितीच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 14:00 IST2022-05-15T13:53:18+5:302022-05-15T14:00:36+5:30
नीरा पोलीस घटनास्थळी जाऊन मृत व्यक्तीचे शव जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले

पुरंदरच्या नीरा बाजार समितीच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
नीरा : नीरा कृषी उत्पन्न बाजर समितीच्या आवारात अज्ञात व्यक्तीचा म्रुतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्ती काही दिवसांपासून नीरा शहरात भिक मागून उपजिविका करत होती. नीरा पोलीस घटनास्थळी जाऊन मृत व्यक्तीचे शव जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे.
नीरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरा कृषी उत्पन्न बाजर समितीच्या आवारात मुख्य इमारतीच्या मागील बाजुच्या भिंतीला एक व्यक्ती बसल्याचे समजले. पोलीस घटनास्थळी गेले असता एक व्यक्ती अंदाच वय ४०-४५ वर्ष असुन पांढऱ्या रंगाचा रेगा रेगांचा शर्ट, काळी पँन्ट, पायत शांडल, दाढी व केस वाढलेल्या अवस्थेत भिंतीला टेकून म्रुतअवस्थे बसलेल्या दिसुन आला. पोलिसांनी लागलीच प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेला पाचरण करत, मृतदेह जेजुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.
या घटनेबाबत पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी नीरा पोलीसांत खबर दिली असून नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, सुदर्शन हळकर, राजेंद्र भापकर, संदिप मोकाशी, पोलीस मित्र रामभाऊ कर्णवर, शुभम जावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. नीरा परिसरातील कोणाच्या घरातील व्यक्ती मिसिंग असल्यास नीरा पोलीसांशी संपर्क करावा. तसेच सदर व्यक्ती कोणाच्या ओळखीचे असल्यास जेजुरी ग्रामीण रुग्णालयात तातडीने जाऊन ओळख पटवून मृतदेह ताब्यात घ्यावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.