शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Death: बारामती दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सापडला, विमान कोसळण्यापूर्वी कॅप्टन शांभवी पाठक काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:42 IST

Baramati Plane Crash Black Box Found: बारामती विमान अपघात प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तपास यंत्रणांना अपघातग्रस्त लर्नजेट ४५ विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, यामुळे अपघाताचे गूढ उकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघाताच्या तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली. अपघातानंतर अवघ्या २४ तासांत तपास पथकाने अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' शोधून काढला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

दिल्लीच्या व्हीएसआर एव्हिएशन कंपनीच्या 'लर्नजेट ४५' या विमानाचा ब्लॅक बॉक्स घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. डीजीसीए आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने अपघातस्थळाची कसून पाहणी केली. विमानाचे इंजिन, पंखे आणि इतर अवशेषांची तपासणी करून नमुने गोळा करण्यात आले. ब्लॅक बॉक्समधील डेटा आता विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवला जाईल, ज्यामुळे तांत्रिक बिघाड की मानवी चूक, हे स्पष्ट होईल.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर किंवा विमान नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून कॅप्टन शांभवी पाठक हिने "ओह शिट!", असे शब्द उच्चारले, असे सांगितले जात आहे. मात्र, कॅप्टनच्या या शेवटच्या शब्दांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या अंतिम तपासणीनंतरच यावर शिक्कामोर्तब होईल.

एएआयबी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा अचूक क्रम आता लावता येईल. विमान किती उंचीवर होते, हवेचा वेग काय होता आणि पायलटच्या शेवटच्या हालचाली काय होत्या? याची सर्व माहिती आता समोर येईल.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेAjit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटना