शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल कुटुंबीयांनी जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले; चालकाला मानसिक धक्का, आयुक्तांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 15:47 IST

अग्रवाल यांनी आमिष दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असून मी सुरुवातीला दबावात घाबरून जाऊन जबाब दिला होता

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणी गेल्या आठडाभरात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन बाळाला वाचवण्यासाठी शहरातील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. याच अग्रवाल कुटुंबातील विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल या आरोपींनी त्यांच्या चालकावर खोटा जबाब देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२, धंदा - चालक, रा. पुणे), असे या चालकाचे नाव असून, त्याने हा सगळा प्रकारपोलिसांना सांगितला. पोलिसआयुक्तांनी शनिवारी (दि. २५) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी चालक गंगारामला आपल्या घरात डांबून ठेवले होते. त्याचा मोबाइल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगारामची बायको नातेवाइकांना घेऊन अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. अग्रवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला, तेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. अग्रवाल यांच्या घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला होता; पण पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) त्याचा जबाब नोंदवून घेतला. शुक्रवारी त्याची प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी सुरेंद्रकुमार अग्रवाल याच्यासह त्याचा मुलगा विशाल अग्रवाल या दोघांवर ड्रायव्हरने दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३४२, ३६५ आणि कलम ३६८ अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली. विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला आवश्यक ती प्रक्रिया करून ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

मी गाडी चालवत नव्हतो, ड्रायव्हरची स्पष्टोक्ती...

अपघात झाला त्यावेळी पोर्शे कार माझा मुलगा नव्हे, तर ड्रायव्हरच चालवत होता, असा दावा विशाल अग्रवाल यांनी न्यायालयात केला होता. मात्र, अपघाताच्या वेळी गाडी विशाल अग्रवाल यांचा मुलगाच चालवत होता, अशी कबुली ड्रायव्हरने दिली. माझी या सगळ्या प्रकरणात कोणतीही चूक नाही. अग्रवाल यांनी आमिष दाखवून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला दबावात घाबरून जाऊन जबाब दिला. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. मात्र, मी घाबरलो होतो, असे ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले. अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्याला जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले, याचा ड्रायव्हर गंगारामला मोठा मानसिक धक्का बसल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातPoliceपोलिसcommissionerआयुक्तCrime Newsगुन्हेगारीcarकारHealthआरोग्य