शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

टेस्ट ट्युब बेबीने मानले डॉक्टरांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 9:06 PM

डॉ.सुभाष मुखर्जी यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मितीसाठी खूप संशोधन केले. त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे मी तुमच्यासमोर उभी आहे....

ठळक मुद्देकनुप्रिया अगरवाल : जगातील दुसरा प्रयोग भारतातडॉक्टर व शास्त्रज्ञांचा आदर करा व सृजनांचे स्वागत करा, असे आवाहनटेस्ट ट्यूब बेबी हे डॉक्टरांची स्वत:ची पध्दत असल्याने ती यशस्वी

पुणे : सृजनाचे नेहमी स्वागत करायला हवे. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ समाजासाठी मनापासून संशोधन करत असतात आपण त्यांच्या या संशोधनाचा स्वीकार करायला पाहिजे. त्यांचा आदर करावा. डॉ.सुभाष मुखर्जी यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मितीसाठी खूप संशोधन केले. त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे मी तुमच्यासमोर उभी आहे, अशी भावना भारतातील पहिली आणि जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी कनुप्रिया अगरवाल यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली.डॉ. खुर्द एन्डोस्कोपिक सर्जरी, फर्टिलिटी व आयव्हीएफ सेंटर आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने अगरवाल यांचा ४० व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, टेस्ट ट्युब बेबीचे जनक डॉ. सुभाष मुखर्जी यांचे एम्ब्रियोलॉजिस्ट सुनीत कुमार मुखर्जी, लायन्स क्लबचे डॉ संजीव खुर्द, डॉ. भारती ढोले पाटील, डॉ. ज्योती तोष्णीवाल आदी उपस्थित होते. अगरवाल म्हणाल्या, डॉ मुखर्जी यांनी केलेले संशोधन आणि स्वीकारलेल्या आव्हानामुळे मी हे जग पाहू शकते. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शूर होण्याचा प्रयत्न करा. कुठलेही काम करताना चूक झाल्यावर माफी मागा, डॉक्टर व शास्त्रज्ञांचा आदर करा व सृजनांचे स्वागत करा, असे आवाहनही त्यांनी केले. भारतीयांची बुद्धिमत्ता परदेशातील बुद्धिमत्तेच्या तोडीची आहे. हे कनुप्रियाच्या जन्माने दाखवून दिले. असे डॉक्टर सातत्याने विविध विषयात संशोधन करत असतात. त्यांना आपण सर्वांनी प्रोत्साहन द्यायला हवे, अपेक्षा टिळक यांनी व्यक्त केली. सुभाष मुखर्जी हे मोठे संशोधक होते. त्यांचे योगदान फारच महत्वाचे आहे. त्यांनी फ्रोजन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक ही प्रक्रिया शोधून काढली. टेस्ट ट्यूब बेबी हे डॉक्टरांची स्वत:ची पध्दत असल्याने ती यशस्वी ठरली. राष्ट्राला भूतकाळ नसेल तर ते भविष्यकाळ निर्माण करू शकत नाही. सुभाष मुखर्जी यांच्या प्रयोगातून भविष्य निर्माण होऊ शकते, अशे सुनीत कुमार मुखर्जी यांनी नमुद केले. ---------------------

टॅग्स :PuneपुणेIndiaभारत