Eknath Shinde: ठाकरे सरकार अडलेल्या, नडलेल्या सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 17:12 IST2021-10-10T17:10:35+5:302021-10-10T17:12:08+5:30
राज्यामध्ये कार्यरत असलेले (Thackeray Sarkar) ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून अढलेल्या व नढलेल्या सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जातील

Eknath Shinde: ठाकरे सरकार अडलेल्या, नडलेल्या सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविणार
पिरंगुट : राज्यामध्ये कार्यरत असलेले ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून अडलेल्या व नडलेल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जातील असे प्रतिपादन नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पिरंगुट येथील घोटावडे फाटा या ठिकाणी केले.
शिवसेना नेते तथा उद्योजक माधव उर्फ आबासाहेब शेळके यांच्या नवीन (shivsena) शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, मुळशी तालुक्यामध्ये नव्याने पडलेल्या पीएमआरडीए (pmrda) चे आरक्षण व रिंग रोड यामध्ये शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या उद्भवलेल्या सर्व समस्या व प्रश्न सोडविल्या शिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असे देखील आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तेव्हा याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना समन्वयक रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, पुणे जिल्हा सह संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, तसेच बहुसंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.