शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या पूर्वसंध्येला खेडमध्ये दहशतीचे सावट; राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 23:14 IST

या हल्ल्यात शरद बुट्टे-पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आंबेठाण : खेड तालुक्यातील आंबेठाण–पाईट जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनीता बुट्टे यांच्या पती व माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्यावर धामणी (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. ६) रात्री अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात शरद बुट्टे-पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद बुट्टे-पाटील आपल्या एका मित्रासोबत शुक्रवारी रात्री धामणी येथील मित्राकडे जात होते. धामणी गावाकडे जाणारा रस्ता दगड टाकून अडविण्यात आला होता. रस्ता कोणी बंद केला आहे, हे पाहण्यासाठी बुट्टे-पाटील गाडीतून खाली उतरले असता दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत असलेला सहकारीही जखमी झाला आहे. दोघांनाही वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुट्टे-पाटील यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र डॉक्टरांचे पथक सतत लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आंबेठाण–पाईट परिसरात तणाव निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. जुन्या वादातून किंवा राजकीय कारणातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Khed: NCP Candidate's Husband Attacked on Eve of Election, Tension Grips

Web Summary : On election eve, Sharad Butte-Patil, husband of an NCP candidate, was brutally attacked in Khed. Critically injured, he's hospitalized. Tensions rise as police investigate political motives behind the assault. Security concerns escalate before elections.
टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीNCPराष्ट्रवादी काँग्रेस