शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

वारजे माळवाडीत हत्यारे उगारून दहशत; पटेकर टोळीवर 'मोक्का'ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:42 AM

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....

पुणे : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दोघांना वीट मारून जखमी केले तसेच तेथे जमलेल्या लोकांना शिवीगाळ करून, हत्यारे उगारून दहशत निर्माण करणाऱ्या गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर आणि त्याच्या अन्य ६ साथीदारांवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. चालू वर्षातील ही मोक्काची १६ वी कारवाई आहे.

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात अमरजित मुन्ना सिंग (२३), रोहन अनिल चव्हाण (२५), शुमवेल ऊर्फ दाद्या बाबूराव गायकवाड (३०, तिघेही रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) यांना अटक केली आहे. टोळी प्रमुख गणेश ऊर्फ गुड्या अनिल पटेकर याच्यासह इतर चार जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

टोळी प्रमुख गणेश पटेकर याने गुन्हेगारांची टोळी तयार करून अपराध केले आहेत. आरोपींनी खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करून तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, अपहरण, जबरी चोरी, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत.

पटेकर टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांनी पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्यावतीने अपर आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काच्या कारवाईस मंजुरी दिली. अधिक तपास कोथरूड विभागाचे सहाय्यक आयुक्त भीमराव टेळे हे करत आहेत.

टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाCrime Newsगुन्हेगारी