शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरात तडीपार गुंडाची हातात कोयता घेऊन दहशत; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 10:30 PM

पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंती दिवशी एका तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

पुण्याच्या सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात शिवजयंती दिवशी एका तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन नाचत दहशत निर्माण केल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोशन लोखंडे असे त्या तडीपार गुंडाचे नाव असून त्याच्याविरुद्ध शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा, आदी प्रकारचे गंभीर गुन्हे याआधी दाखल आहेत. त्याला याच्या आधीही तडीपार केले होते. त्याला तडीपार करण्याची ही दुसरी वेळ आहे. 

डान्स करीत असलेल्या ग्रुपमधे नाचत असलेल्या तरुणांपैकी एकाकडे पिस्तुलही दिसत आहे. तसेच यातील काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने हे प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून आले मात्र या व्हिडिओमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तडीपार असणारे गुन्हेगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे माहित असूनही पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकात संतापाची लाट आहे.पूर्वी तडिपारीच्या नावाने गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होत असे. अशा गुन्हेगारांना समाजदेखील आपल्या दैनंदिन व्यवहारापासून चार हात लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. काळ बदलला तशी गुन्हेगार, पोलिस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाचीही मानसिकता बदलत गेली. मात्र, तडीपारीचा कायदा आहे तसाच राहिला. यामुळे तडीपारीची कारवाई कागदावर भरीव वाटत असली तरी त्याचा प्रत्यक्षात कोणताही फायदा होत नसल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे.

काही पोलिस अधिकारी यास मूक संमती देत असले तरी कायद्यापुढे शहाणपण चालत नसल्याने 'येरे माझ्या मागल्या' असाच अनुभव येत आहे. कायद्यातील तरतुदी आणि वास्तवतेच्या अशा फरकांमुळे गुन्हेगारांना फायदा होत आहे. कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन तडीपार गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. नाही म्हणायला पोलिस कारवाई करीत असले तरी त्यांच्या कारवाईची धार केव्हाच बोथट झाल्याचे दिसून येत आहे. राजकारण, पोलिसांची अनास्था, गुन्हेगारांची मानसिकता अशा अनेक कारणांनी तडीपारीच्या कायद्यालाच 'तडीपार' करण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी