शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोघे जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 16:10 IST

पु्ण्यामधून जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने घटना घडली

ठळक मुद्देअपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटार कारमध्ये अडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला

भिगवण: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जमखी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पु्ण्यामधून जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने घटना घडली. नंदकिशोर भाऊसाहेब जोगदंड, सौदागर दगडु उंप (वय.३५ रा.दोन्ही लातुर) यांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला. तर चालक नवनाथ खंडु कांबळे (वय. २८ रा. लातुर) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुुुुसार, लातुर जिल्ह्यातील वासनगाव येथील दोघे चालकांसह पुणे येथे जुनी गाडी खरेदीसाठी आले होते. ती घेऊन गावी जात असताना या महामार्गावरील उतारावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोघांच्या डोक्याला व संपुर्ण शरीराला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. तर चालक गंभीर जखमी झाला आहे.  गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीतील जखमी व मृतांना गाडीबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटार कारमध्ये अडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीतील दोघे जागीच ठार झाले होते. तर चालकांस गाडीतून बाहेर काढण्यात आले. जखमीवर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अधिक तपास भिगवणपोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघातBhigwanभिगवण