टेम्पो- कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार; तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 22:36 IST2023-09-03T22:36:09+5:302023-09-03T22:36:36+5:30

टेम्पो- कारच्या धडकेत  तीन जण जागीच ठार, तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

Terrible accident on Talegaon Dhamdhere-Nhaware road, three killed on the spot in a collision with a tempo-car | टेम्पो- कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार; तीन जण जखमी

टेम्पो- कारचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार; तीन जण जखमी

तळेगाव ढमढेरे- टेम्पो- कारच्या धडकेत  तीन जण जागीच ठार, तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात तळेगाव ढमढेरे - न्हावरे रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्ती येथे झाला. हा अपघात आज रविवार (दि. ३ सप्टेंबर) रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची भीषणता एवढी होती की यामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा झाला.

  मिळालेली माहिती अशी,  तळेगाव ढमढेरे - न्हावरे रस्त्यावर तळेगाव ढमढेरे येथील तोडकर वस्ती येथे भरधाव वेगात असलेल्या टेम्पो (क्र. एमएच १६ सिडी ४७४२) व स्विफ्ट कार (क्र. एमएच १२ एसयु ५६५९) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात  स्विफ्ट कार मधील कविता बोरुडे (वय ४० वर्षे), योगिता बोरुडे (वय ४० वर्षे) व कार चालक राजू शिंदे (वय २५ वर्षे, तिघेही रा.श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील किशोरी बोरुडे (वय १७ वर्षे) ही मुलगी तसेच टेम्पो मधील धीरज कांतीलाल लोखंडे व श्रीराम बापूराव मांडे असे तिघे जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Terrible accident on Talegaon Dhamdhere-Nhaware road, three killed on the spot in a collision with a tempo-car

टॅग्स :Accidentअपघात