पुणे सोलापुर महामार्गावर भीषण अपघात; वाहनांचा चक्काचूर, महिलेचा मृत्यू तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:26 IST2022-05-25T15:23:04+5:302022-05-25T15:26:37+5:30
पुणे सोलापुर महामार्गावर कुरकुंभ एमआयडीसी चौकात बुधवार (दि.२५) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला

पुणे सोलापुर महामार्गावर भीषण अपघात; वाहनांचा चक्काचूर, महिलेचा मृत्यू तिघे गंभीर जखमी
कुरकुंभ : पुणे सोलापुर महामार्गावर कुरकुंभ एमआयडीसी चौकात बुधवार (दि.२५) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहनांचा समोरील बाजूने चक्काचूर झाला असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. इतर तिघे गंभीर जखमी आहेत.
त्यांच्यावर पाटस येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. वाहनातील सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने इतर व्यक्तींचा जीव वाचून मोठा अनर्थ टळला आहे. अपघातग्रस्त वाहनांचा वेग इतका होता की रस्त्याच्या कडेला असणारी लोखंडी सुरक्षा कठडे तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर जाऊन जोरात धडक दिली.