चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुणे शहरात भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 13:40 IST2022-06-15T13:30:56+5:302022-06-15T13:40:01+5:30
रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुणे शहरात भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी
धनकवडी : अपघातांचे हॉटस्पॉट ठरलेल्या कात्रज-देहूरोड बाह्यमार्गावर कात्रजकडून-नवले ब्रीजकडे जाणाऱ्या मार्गावर शिवसृष्टीसमोर सकाळी साडे अकराच्या सुमारास रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी झाला. कात्रजकडून नवले पुलाकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात झाला.
सिमेंटचा मिक्सर एका चारचाकीवर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात २ जण जखमी असून चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मारुती पवार, (वय ५० वर्षे) व माधुरी पवार ( रा. नांदेडसिटी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
सकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे वाहतूक कोंडी देखील झाली. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.