शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 3:31 PM

भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे...

ठळक मुद्दे डिजिटल चित्रपटांच्या साठवणुकीसाठी एनएफएआय उभारणार यंत्रणा

- नम्रता फडणीस -

पुणे : गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत ‘डिजिटल’ चित्रपट निर्मितीचा ‘ट्रेंड’ आला आहे. मात्र डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट वर्षानुवर्षे जतन करण्यासाठीची यंत्रणा तूर्तास तरी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे डिजिटल चित्रपटांच्या साठवणुकीसाठी संग्रहालयाने पावले उचलली असून, ‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. चित्रपटसृष्टीनेही ही तंत्रज्ञानाची स्थित्यंतरे अनुभवली आहेत. चित्रपटकर्त्यांना सेल्युलाईड, १६ एमएम, ३५ एमएम असा प्रवास घडला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही  ‘डिजिटल’ युग अवतरले आहे. २00८ पासून डिजिटल माध्यमात चित्रपटनिर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र  काही नवीन डिजिटल माध्यमातील चित्रपट देखील संग्रहालयाकडे जतनासाठी येत आहेत. जुन्या स्वरूपातील चित्रपटांच्या तुलनेत नव्याने उपलब्ध झालेल्या डिजिटल चित्रपटांचा साईज अधिक असल्यामुळे या चित्रपटांची साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात माहिती देताना संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, संग्रहालयाचे काम हे चित्रपटांची रिळं जतन करण्याचे आहे. सध्याचे सर्व चित्रपट डिजिटल माध्यमात बनत आहे. डिजिटल चित्रपट जतन करण्यासाठीची यंत्रणा संग्रहालयाकडे नाही. त्यामुळे ‘डिजिटल स्टोअर’ उभारण्यासाठी आयआयटी मुंबई, कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, सीडॅक, एनआयसी या संस्थांमधील तज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. एनएफएआयच्या कोथरूड फेज २ मध्ये ही डिजिटल यंत्रणा उभारली जाईल. यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील.डिजिटल चित्रपटांच्या जतन प्रक्रियेसाठी वारंवार खर्च करावा लागतो. उदा: एखाद्याची मोठी निर्मिती संस्था आहे. जे वीस ते पंचवीस चित्रपट तयार करतात. त्यांनी जर त्यांचे चित्रपट जतन करण्यासाठी  संग्रहालयाकडे  दिले नाहीत, तर त्यासाठी निर्मात्यांना विशेष यंत्रणा राबवावी लागेल. त्याच्या देखरेखीसाठी मनुष्यबळ वाढवावे लागेल. तो जतन करण्याचा खर्च हा सेल्युलाईडपेक्षा अधिक आहे. त्यापेक्षा हे चित्रपट संग्रहालयाकडे जतन करण्यासाठी देणेच अधिक फायदेशीर ठरणार असल्याचे ते म्हणाले. पुणे : गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत ‘डिजिटल’ चित्रपट निर्मितीचा ‘‘ ट्रेंड ’’ आला आहे. मात्र डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट वर्षानुवर्षे जतन करण्यासाठीची यंत्रणा तूर्तास तरी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे डिजिटल चित्रपटांच्या साठवणुकीसाठी संग्रहालयाने पावले उचलली असून, ‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. चित्रपटसृष्टीनेही ही तंत्रज्ञानाची स्थित्यंतरे अनुभवली आहेत. चित्रपटकर्त्यांना सेल्युलाईड, १६ एमएम, ३५ एमएम असा प्रवास घडला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही  ‘डिजिटल’ युग अवतरले आहे. २00८ पासून डिजिटल माध्यमात चित्रपटनिर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र  काही नवीन डिजिटल माध्यमातील चित्रपट देखील संग्रहालयाकडे जतनासाठी येत आहेत. जुन्या स्वरूपातील चित्रपटांच्या तुलनेत नव्याने उपलब्ध झालेल्या डिजिटल चित्रपटांचा साईज अधिक असल्यामुळे या चित्रपटांची साठवणूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात माहिती देताना संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, संग्रहालयाचे काम हे चित्रपटांची रिळं जतन करण्याचे आहे. सध्याचे सर्व चित्रपट डिजिटल माध्यमात बनत आहे. डिजिटल चित्रपट जतन करण्यासाठीची यंत्रणा संग्रहालयाकडे नाही. त्यामुळे ‘डिजिटल स्टोअर’ उभारण्यासाठी आयआयटी मुंबई, कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट, सीडॅक, एनआयसी या संस्थांमधील तज्ज्ञांशी चर्चा झाली आहे. एनएफएआयच्या कोथरूड फेज २ मध्ये ही डिजिटल यंत्रणा उभारली जाईल. यासाठी लवकरच निविदा काढल्या जातील...............टेंडर अजून निघाले नाही..’सध्या जगभरामध्ये चित्रपटांसाठी एल्टिओ 7 टेप (लिनिअर टेप ओपन) जनरेशनचा वापर केला जातोय. भारतातही हेच तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली आहे. एखादा चित्रपट हाय रिझोल्युशनमध्ये म्हणजे 2 के ( २ टू ३ टेराबाईट) आणि 4 के ( ८ टू १२ टेराबाईट) प्रकारात असतो. या ‘डिजिटल स्टोअर’मध्ये त्याची वेगळी व्हजनर््स आपण जतन करू शकू. डिजिटल लायब्ररी किंवा इंटरनेटच्या माध्यमातून वितरित करायचे असेल तर वेगवेगळी लो रिझोल्युशनची व्हर्जन्स लागतील. त्यात पासवर्ड दिलेले असतील.

............................

डिजिटल स्टोअरसाठीचे टेंडर अजून निघालेले नाही. ते लवकरच निघेल. मुळातच  या डिजिटल चित्रपटासाठी कुठल्याही राज्यात पॉलिसी तयार झालेली नाही.  डिजिटल हे असे तंत्रज्ञान आहे ज्यात बॅकअप ठेवणे आवश्यक आहे. एकाच ठिकाणी दोन्ही कॉपी ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे निर्मात्यांना एक कॉपी स्वत:जवळ आणि दुसरी वेगळ्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल चित्रपट जतन करण्याची गरज नसते. केवळ वर्षानुवर्षे टिकण्यासाठी यंत्रणा राबवावी लागणार आहे.

- डॉ. उज्ज्वल निरगुडकर, तांत्रिक सल्लागार राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाdigitalडिजिटलPrakash Magdumप्रकाश मगदूम