शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात शेततळ्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 18:53 IST

मंगळवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले.

ठळक मुद्देसंपूर्ण इंदापूर तालुका ह्या घटनेने हळहळ व्यक्त

इंदापूर :  इंदापूर शहरातील सरस्वतीनगर येथील अवघ्या नऊ वर्षाच्या आर्यन मच्छिंद्र नाथजोगी या चिमुकल्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवार ( दि. २० ) रोजी ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र मंगळवार ( दि. २१ ) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्याच्या पाण्यातून काढण्यात आले. त्यामुळे संपूर्ण इंदापूर तालुका ह्या घटनेने हळहळ व्यक्त करीत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर शहरातील आर्यन दोन मित्रांसोबत खेळायला गेला. खेळ संपल्यानंतर हातपाय धुण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाच्या इनडोअर टेनिस कोर्ट च्या पाठीमागे असणाऱ्या शेततळ्यात पाय धुण्यासाठी गेला. आणि पाय घसरून तो शेततळ्यात पडला. सोबत असणारे दोन लहान मित्र यांनी घाबरून घराकडे पळ काढला. या घटनेबद्दल कोठेही वाच्यता केली नाही. संबंधित मुलाच्या आई-वडिलांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार सोमवारी दिली होती. मंगळवारी सकाळी आर्यन सोबत खेळायला गेलेल्या दोन मुलांनी सदरची घटना सांगितल्याने आर्यन चा मृतदेह सापडला आहे.

मुलाचे आई वडील मजुरी करून आपले कुटुंब चालवतात. अत्यंत हलाखीत जीवन जगत असताना अचानक एक मुलगा पाण्यामध्ये बुडवून मृत्यू पावल्याने, या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबियांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे व त्यांच्या अन्य सहकारी मदत करीत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरDeathमृत्यूWaterपाणीFarmerशेतकरीPoliceपोलिस