शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगर कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलची दुचाकीला धडक; बेकरीत काम करणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:24 IST

अपघात इतका भीषण होता कि, दुचाकीचा चक्काचूर झाला

आळेफाटा: टेम्पो ट्रॅव्हल बस व दुचाकी यांचे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन परप्रांतीय कामगार ठार झाल्याची घटना नगर कल्याण महामार्गावरमहामार्गावर वडगाव आनंद शिवारात चौगुलेवस्ती जवळ बुधवारी (7 जून ) रात्री पावणे आकाराच्या वेळेस घडली. 

या अपघातात योगेश रामकुमार (वय 21 रा धामणकर बिजनोर उत्तरप्रदेश) चाहत बाबुराम (वय 17 रा बिजनोर खरणगपुर उत्तरप्रदेश) संजीव कुमार नथुसिंह (वय 27 रा बिजनोर नगीना उत्तरप्रदेश) अशी मृत तरूणांची नावे आहेत. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळेफाटा येथून नगर कल्याण महामार्गावर जाणारी दुचाकी व कल्याण बाजुकडून भरधाव वेगात येणारी टेंम्पो ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये आळेफाट्या पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वडगाव आनंद शिवारात चौगुलेमळा येथे बुधवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील योगेश रामकुमार, संजीवकुमार नथुसिंह व चाहत बाबुराम हे गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण उत्तरप्रदेशमधील असून आळेफाटा येथील एका बेकरीत काम करत होते. रात्रीच्या वेळेस ते दुचाकी वरून जेवन करण्यासाठी वडगाव आनंद येथे जात होते.

अपघातानंतर ग्रामस्थ व आळेफाटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुचाकीवरील जखमींना आळेफाटा येथील दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर सर्वजण मृत असल्याचे डाॅक्टर्सनी सांगितले. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचा चक्काचूर झाला. तसेच ट्रॅव्हल्स बसचेही नुकसान झाले. या अपघाताचा गुन्हा आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल झाला असून पोलिसांनी टेंम्पो ट्रॅव्हल्स चालक परमेश्वर दत्तात्रय आंधळे (रा भिवंडी) यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर करत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक