पिरंगुट घाटामध्ये टेम्पोचा अपघात, कामगाराचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 19:41 IST2025-08-31T19:40:58+5:302025-08-31T19:41:15+5:30

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी हजर झाले.

Tempo accident at Pirangut Ghat, worker dies on the spot | पिरंगुट घाटामध्ये टेम्पोचा अपघात, कामगाराचा जागीच मृत्यू

पिरंगुट घाटामध्ये टेम्पोचा अपघात, कामगाराचा जागीच मृत्यू

पिरंगुट : पिरंगुट (ता,मुळशी) मध्ये पुन्हा एकदा अपघात घडला असून या अपघातामध्ये फरशी घेऊन जाणारा छोटा टेम्पो पलटी झाला असून या अपघातामध्ये टेम्पोच्या पाठीमागे बसलेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या बाबत चे सविस्तर वृत्त असे की दीपक मसकू पवार यांच्या मालकीचा टेम्पो ( MH12 PQ7215)( अशोक लेलँड कंपनीचा  छोटा हत्ती ) आंबेगाव (पुणे) येथून फरशी  घेऊन पिरंगुटच्या दिशेने येत होता तेव्हा हा टेम्पो पिरंगुट घाटामध्ये भरधाव वेगाने आला असता टेम्पो मधील मद्यप्राशन केलेल्या ड्रायव्हरचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले तेव्हा त्यांनी समोरून येत असलेल्या (MH12RY8179) व (MH14KB 9729) या दोन चार चाकी वाहनांना जोरदार धडक दिली तेव्हा सुदैवाने या धडकेमध्ये दोन्ही चार चाकी वाहनामधील कुठलाही व्यक्ती जखमी झाला नसून त्यांच्या वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे. 

परंतु त्या प्रसंगात टेम्पोवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात तो टेम्पो पुढे जाऊन पलटी झाला. त्यावेळी त्या टेम्पो मध्ये तीन व्यक्ती प्रवास करीत होत्या तेव्हा त्यामध्ये ड्राइव्हर व ड्राइवरच्या बाजूला पवन पैकरमा कुमार (वय 32 वर्ष) हा व्यक्ती बसला होता तसेच टेम्पोच्या पाठीमागे साजन कुमार (वय वर्ष 26,रा.आंबेगाव डी मार्ट ता,हवेली,जि.पुणे)हा व्यक्ती बसला होता.तेव्हा टेम्पो पलटी झाला असता पाठीमागे बसलेल्या साजन कुमार या कामगाराच्या अंगावरती सगळ्या फरशा पडल्या आणि फरश्याच्या ढिगार्‍याखाली चेंगरून त्या कामगाराचा जागेवरतीच मृत्यू झाला आहे.

 पिरंगुट घाटामध्ये पलटी झालेला टेम्पो पाहण्यासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांसह येथील स्थानिक नागरिकांनी सुद्धा गर्दी केली होती त्यावेळी सर्वांना पलटी झालेला टेम्पो व टेम्पो मधील फुटलेल्या व अस्तव्यस्त झालेल्या फरश्याच दिसत होत्या त्यावेळी अचानकपणे जमलेल्या नागरिकांना फरशांमधून रक्ताच्या धारा बाहेर वाहत येत असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी उपस्थित नागरिकांना समजले की आत मध्ये कोणीतरी अडकलेल आहे त्यावेळी उपस्थितानी तातडीने टेम्पो मधील फरशा उचलायला सुरुवात केली आणि फरश्या उचलल्यानंतर फरशांच्या  खाली एक कामगार अडकून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ पिरंगुट पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक देविदास फड,प्रवीण घुटुकडे, बळीराम नवले हे घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांनी तेथील वाहतूक सुरळीत करीत मृत्य व्यक्तीला तातडीने ॲम्बुलन्स मध्ये घालून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले असुन या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Tempo accident at Pirangut Ghat, worker dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.