तापमानाच्या पाऱ्याने वाढला पुणेकरांचा ‘ताप’; दोन दिवसांत आणखी तापमान वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 15:16 IST2023-05-19T15:16:05+5:302023-05-19T15:16:36+5:30

गेल्या आठवड्यात तापमान काहीसे उतरले होते. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला होता. चाळीशीपार गेलेले तापमान ३५ ते ३८ अंशांवर नोंदवले जात होते.

Temperature of Pune increased | तापमानाच्या पाऱ्याने वाढला पुणेकरांचा ‘ताप’; दोन दिवसांत आणखी तापमान वाढणार

तापमानाच्या पाऱ्याने वाढला पुणेकरांचा ‘ताप’; दोन दिवसांत आणखी तापमान वाढणार

पुणे : शहरातील तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीवर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात तापमान चढ-उतार होत आहे. त्यामुळे पुणेकरांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या दोन-तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

गेल्या आठवड्यात तापमान काहीसे उतरले होते. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला होता. चाळीशीपार गेलेले तापमान ३५ ते ३८ अंशांवर नोंदवले जात होते. पण आता पुन्हा तापमान वाढत आहे. किमान तापमानही २५ अंशांच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा जाणवत आहे. घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळा अंगाला झोंबत आहेत. म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे. शुक्रवारी मगरपट्टा आणि लोहगाव परिसरात ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान येत्या दोन-तीन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

शहरातील कमाल तापमान
मगरपट्टा : ४०.७
लोहगाव : ४०.३
शिवाजीनगर : ३९.०
पाषाण ३९.४
 

Web Title: Temperature of Pune increased