शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, आम्ही खेळायचं कुठं?

By admin | Updated: October 14, 2016 05:13 IST

लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, यासाठी आळंदी नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या शहरातील हरिपाठ बाल उद्यानाची देखरेखीअभावी

आळंदी : लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण मिळावे, यासाठी आळंदी नगर परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या शहरातील हरिपाठ बाल उद्यानाची देखरेखीअभावी दुरवस्था झाली आहे. उद्यानात जागोजागी गवत उगवले आहे तसेच तेथे असलेल्या खेळण्यांच्या साहित्याचीही मोडतोड झाल्याने ‘आम्ही खेळायचं कुठं?’ असा प्रश्न चिमुकल्यांना पडला आहे. वीस-पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या आळंदी शहरात नव्या एकाही ठिकाणी पालिकेच्या वतीने उद्यान तसेच विरंगुळा केंद्र उभारण्यात आले नाही. चऱ्होली रस्त्यावर काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या हरिपाठ बाल उद्यानाची देखभाल-दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. येथील खेळणी तुटल्यानंतर तेथील स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून नवीन खेळणी बसविली होती. परंतु, काही काळानंतर त्यांचीही दुरवस्था झाली. मैदानात गवताचे साम्राज्य पसरले आहे. मैदानाच्या कडेला उभारण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे गप्पाटप्पा केंद्रही टाळे लावलेल्या अवस्थेत आहे. येथे असलेले स्वच्छतागृहही बंद पडले आहे. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या झोका, घसरगुंडीची तर तोडफोड झाली असून हे बाल-उद्यान रात्रीच्या वेळी तळीरामांचा हक्काचा अड्डा बनला आहे. वीजपुरवठाही खंडित झाला असून, रात्रीच्या वेळी उद्यानात अंधाराचे साम्राज्य असते. खेळण्यांच्या साहित्याला गंज चढला असून त्याच गंजलेल्या घसरघुंडी-झोपाळ्यावर लहानग्यांना झुलावे लागते. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवर दिवाळी आहे. काही दिवसांतच शाळांना सुटी लाग्ेल. सुटीत लहान मुलांची ओढ उद्यानाकडे असणारच, तेव्हा त्यांना या दुरवस्थेचा सामना करावा लागू नये, याकरित पालिकेने उद्यानातील वाढलेले गवत काढून तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करावी, सुंदर फुलझाडांची लागवड करावी, अशा मागण्या नागरिक करीत आहेत. याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की उद्यानदुरुस्तीबाबत खर्चाचे अंदाजपत्रक काढण्यात आले आहे. लवकरच ते मंजूर करून काम सुरू करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न असला, तरी दिवाळी नंतरच काम मार्गी लागेल.