शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘तेजस्विनी’मुळे महिला प्रवाशांना सुरक्षेचे कवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:53 IST

रेल्वे सुरक्षा दलाचा उपक्रम : महिला प्रवाशांना माेठा दिलासा

पुणे : रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर आला होता. विशेषत: रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची छेड काढण्याचे प्रकार वारंवार घडत होते. यामुळे महिला प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून ‘तेजस्विनी पथका’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल व एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करताना महिला प्रवाशांना सुरक्षेची कवच मिळाली आहे.

पुणे विभागातून अनेक महत्त्वाच्या गाड्या धावतात. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी तेजस्विनी पथक सुरू करण्यात आले होते. परंतु काही काळानंतर बंद करण्यात आली होती. त्यामुळे महिला प्रवाशांना अडचणी येत होत्या. नवे रेल्वे सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांनी पुन्हा तेजस्विनी पथक सुरू केला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने या पथकाकडे केवळ प्रवासी महिलाच नव्हे, तर मुलांच्या सुरक्षिततेचीही जबाबदारी सोपविली आहे.

या पथकात सहायक उपनिरीक्षक आणि दोन महिला कर्मचारी आणि एक पुरुष कर्मचारी नेमण्यात येणार आहे. तेजस्विनी पथकांकडून दररोज दैनंदिन लोकल गाड्यांमधील महिला प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेविषयक अडचणी जाणून घेण्यात येत आहेत. महिलांवरील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ आणि विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. याबाबत महिला प्रवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हा जनजागृतीचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

व्हॉट्सॲपद्वारेही मदत

तेजस्विनी पथकाने एक व्हॉट्सॲप समूह तयार केला आहे. या समूहात महिला प्रवाशांना जोडण्यात येत आहे. महिलांना मदतीसाठी या समूहाच्या माध्यमातून संपर्क साधता येतो. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा दलही या समूहाच्या मदतीने महिला प्रवाशांशी संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सूचना देत आहे.

लोकलमध्ये तेजस्विनी पथक सुरू करण्यात आले आहे. या पथकातून महिला प्रवाशांमध्ये जागृती केली जाणार आहे. हे पथक सर्व लोकलमध्ये असणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची अडचणी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न आहे.  -प्रियंका शर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे विभाग 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी