'तेजस' गेला ; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 08:57 PM2019-08-10T20:57:00+5:302019-08-10T21:00:18+5:30

अडीच वषार्पुर्वी कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल झालेल्या तेजस या सिंहाचा अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. संध्याकाळी उशीर पर्यंत शवविच्छेदन सुरू होते.  

Tejas Lion death in the Rajiv Gandhi zoo Pune | 'तेजस' गेला ; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू 

'तेजस' गेला ; राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू 

googlenewsNext

पुणे :अडीच वषार्पुर्वी कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल झालेल्या तेजस या सिंहाचा अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. संध्याकाळी उशीर पर्यंत शवविच्छेदन सुरू होते.  तेजस गेली पन्नास दिवस पक्षघातामुळे त्रस्त होता. शरिराच्या पाठीमागील भागाचा पक्षघात झाल्यामुळे तेजसची हालचाल पुर्ण बंद झाली होती. भूक मंदावल्यामुळे आहार कमी होऊन शेवटी शेवटी तेजसने खाणे ही बंद झाले होते. केवळ शिरेतून सलाईन , मल्टीव्हिटामीन्स व इतर औषधे देऊन तेजसवर उपचार सुरू होते.  दोन दिवस प्राणी संग्रहालय प्रशासन शथीर्चे प्रयत्न करीत होते. मात्र  तेजसला वाचविण्यासाठी प्राणी संग्रहालय प्रशासनाने केलेले प्रयत्न अखेर निष्फळ ठरल्याने तेजस ने जगाचा निरोप घेतला.

तेजस आणि सिब्बू या तगडी आशियाई सिंह जोडी ला कात्रज प्राणी संग्रहालयाने अथक प्रयत्न आणि पाठपुरावा करून गुजरात वनविभाग व सक्करबाग प्राणी संग्रहालयाच्या सहकायार्ने कात्रज प्राणि संग्रहालयात आणले होते. ही सिंहाची जोडी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरली होती. त्यांना पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात गर्दी होत होती. दरम्यान पक्षघातामुळे मागील वर्षी तेजस त्रस्त होता. मात्र यावेळी आजाराची तीव्रता कमी होती. सलग अठरा दिवस उपचार केल्यानंतर तेजस पुर्ण बरा झाला होता. आजारातून सावरल्यानंतर तेजस पुन्हा पुर्वी सारखा खंदकामध्ये स्वच्छंदपणे विहार करीत होता. मात्र जुलै महिन्यात आलेल्या दुसऱ्या अर्धांगवायूच्या झटक्यातून तेजस सावरू शकला नाही. कमरेखाली संपूर्ण भाग निकामी झाला होता. डॉक्टरांनी एक दिवस अहोरात्र प्रयत्न केले. मात्र तेजसने अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला.

Web Title: Tejas Lion death in the Rajiv Gandhi zoo Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.