शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:15 IST

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

बारामती : पुणे जिल्ह्यात शिक्षकांचे पगार निधीअभावी रखडले आहे. दिवाळीपूर्वीचे पगार तब्बल महिनाभरानंतर उशिरा करण्यात आले. त्यातही एकट्या जिल्ह्यात ३००० शिक्षकांना अद्याप दिवाळीचा पगार मिळाला नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना असल्याची माहिती पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. राज्य विधिमंडळात देखील वेळोवेळी याबाबत निर्णय झालेले आहेत. शासनाने वेळेवर पगार होण्यासाठी सीएमपी प्रणाली सुरू केली. मात्र तरी देखील पगाराबाबतची दिरंगाई काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरवर्षीप्रमाणे दिवाळीपूर्वी पगार करण्यास शिक्षण विभागास अपयश आले. दिवाळीनंतर देखील पुणे जिल्ह्यातील १३ पैकी १० तालुक्यांचे पगार करण्यात आले. बारामती, खेड, दौंड या तीन तालुक्यांचे अनुदान कमी असल्याने पगार अद्याप करण्यात आलेले नाहीत. 

राज्य शासनाकडून तरतूद उपलब्ध होत नसल्याचे कारण जिल्हा परिषदेकडून सांगितले जात आहे. याउलट राज्याच्या शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. शिक्षकांचे पगार वेळेवर होत नसल्याबाबत खुलासा मागितला आहे .जिल्हा परिषदांनी सण अग्रीम, पुरवणी बिले यासारख्या कारणासाठी वेतनाची रक्कम खर्च केल्याचे संचालक कार्यालयाचे मत आहे.

जिल्हा परिषद आणि शिक्षण संचालक कार्यालय यांच्या टोलवाटोलवीत शिक्षकांचा मात्र कोंडमारा झाला आहे. अनेक शिक्षकांची गृहकर्ज, बँका, पतसंस्था यांची कर्ज हप्ते यासाठी उशीर झाल्याने दंडव्याजाचा भुर्दंड भरावा लागत आहे ,अशी माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

पुढील महिन्यांतही अपुरा निधी

पुणे जिल्हा परिषदेला शिक्षकांच्या पगारासाठी दरमहा ९० कोटींची गरज आहे. या महिन्यांत फक्त ५५ कोटीचा निधी मिळाला. त्यातही मागील महिन्यातील ३ तालुक्याचे पगार करावे लागणार असल्याने पुढील महिन्यात तब्बल ९ तालुक्यातील शिक्षकांना पगाराची वाट पहावी लागणार आहे.

''राज्य सरकार व जिल्हा परिषदा यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुरेशी तरतूद उपलब्ध होत नाही, शिक्षण विभागाचे हे अपयश असून राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. - बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ, पुणे''

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीMONEYपैसा