शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिक्षकाने केला तरुणीचा विनयभंग; तरुणीच्या पतीलाही ठार मारण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 19:32 IST

खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी केली अटक

धायरी : तरुणीचे लग्न ठरल्याने तिने खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाशी संबंध न ठेवण्यास सांगितले. तेव्हा त्याने तिच्याबरोबरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन नियोजित पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी नितीश सुडके ऊर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील  (वय २८, रा. हिंगणे, सिंहगड रस्ता,पुणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार जून २०२२ पासून सुरु होता. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीश हा एका खासगी क्लासेसमध्ये गणित विषय शिकवत. यावेळी तक्रारदार तरुणीनेही त्याच्याकडे गणित विषयासाठी क्लास लावला होता. दरम्यान आरोपी शिक्षक व तरुणी यांच्यात २०२० मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, तक्रारदार तरुणीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरविल्याने तिने नितीश याला संबंध न ठेवण्यास सांगितले.तरीही तो तिला वारंवार भेटून  तक्रारदार तरुणीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत असे, त्याचबरोबर वारंवार तरुणीचा पाठलाग करीत असे. ज्या मुलासोबत फिर्यादीचे लग्न जमले आहे, त्या मुलाला आरोपीने फोन करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली असल्याने त्याच्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक