शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकानेच केले विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 03:50 IST

क्रीडा शिक्षकानेच स्कूल मधील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याने पालक वर्गांमध्ये खळबळ माजली आहे. 

हडपसर : सासवड रस्त्याच्या भेकराईनगर येथील लेक्सिकन इंग्लिश मिडियम स्कूलच्या क्रीडा शिक्षकांने चार विद्यार्थ्यांचे गेल्या १० महिन्यापासून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली हडपसर पोलिसांनी क्रीडा शिक्षकाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.आनंद काळे (वय ४०), रा.काळेपडळ, हडपसर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. क्रीडा शिक्षकानेच स्कूल मधील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याने पालक वर्गांमध्ये खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी हडपसर भेकराईनगर येथील लेक्सिकन इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून असलेल्या आरोपीने स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गेल्या १० महिन्यापासून शाळेत व घरी नेऊन लैंगिक शोषण करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. जानेवारीमध्ये एका मुलावर लैंगिक शोषण हा शिक्षक करीत होता. त्यांनतर अन्य मुलांशी हा शिक्षक तसेच वर्तन करू लागला. त्यानंतर सप्टेंबर मध्ये शाळेत हि मुले एकत्र आली. त्यावेळी त्यांच्यामध्ये याबाबत बोलणे झाले. त्यातील मुले आईवडिलांशी बोलायला घाबरत होती. मात्र एका स्थानिक मुलाने त्यांच्या पालकांशी मोठ्या धाडसाने ही घटना सांगितली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पालकांनी संताप व्यक्त करून शाळेत जाऊन गोंधळ घातला. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले.स्कूलच्या प्रिन्सिपॉल ब्रिगेनजा कॅनडिस म्हणाल्या की विद्यार्थ्यांवर असा काही प्रकार झाल्याची तक्रार आमच्याकडे कोणत्याही पालकांनी दिली नाही. मात्र शिक्षकांनी असे गैरप्रकार केल्यामुळे संस्थेने संबंधित शिक्षकास निलंबित केले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीSchoolशाळा