शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचालकांचा महापालिकेला ठेंगा; मोफत ब्लिचिंग पावडर केवळ एकानेच नेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 18:14 IST

महापालिकेने नोटीसद्वारे टँकरचालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला

- हिरा सरवदेपुणे : गुलियन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) बाधित क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व टँकरमध्ये ब्लिचिंग पावडर मिसळण्याचे आदेश देत महापालिकेने ही पावडर मोफत उपलब्ध करून दिली. मात्र, महापालिकेच्या या आदेशाला टँकरचालकांनी ठेंगा दाखवला आहे. महापालिकेकडून केवळ एका टँकरचालकानेच महापालिकेकडून पावडर नेली आहे. त्यामुळे महापालिकेने नोटीसद्वारे टँकरचालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.धायरी, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड या भागांसह काही गावांमध्ये जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. या भागांतील विहीर आणि बोअरवेल अशा सोळा ठिकाणी टँकर व्यावसायिकांकडून पाणी भरले जाते. यातील बहुतेक व्यावसायिक हे स्थानिक भागातील असून, त्यांच्याकडूनच चांगले पाणी पुरवठ्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. जीबीएसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेड परिसरातील १५ टँकर पॉइंट चालकांच्या जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. यापैकी एका ठिकाणच्या नमुन्यात ई-कोलाय जीवाणू आढळला. त्यामुळे टँकरचालक-मालक, विहिरी व इंधन विहिरी चालकांना महापालिकेने पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याचे आदेश दिले होते.ही पावडर महापालिकेकडून मोफत दिली जाईल, असेही प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही केवळ एका टँकरचालकाकडून ब्लिचिंग पावडर नेण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने आता उर्वरित खासगी टँकरचालक, विहिरी, मालकांना नोटीस बजावली असून याद्वारे कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, खासगी टँकर, आरओ प्लँटमधील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी घेतले आहे. महापालिकेने आता खासगी टँकर पाणी भरणा केंद्र व खासगी पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील (आरओ प्लँट) पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.पाणी तपासणीसाठी सोसायट्यांनीच पालिकेकडे यावेधायरी, नांदोशी, किरकटवाडी, नांदेड या भागांसह काही गावांमध्ये जीबीएसचे रुग्णसंख्या वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. दूषित पाण्यामधून हा आजार होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाण्याची शुद्धता तपासणीसाठी महापालिकेने सोसायट्यांनाच पालिकेकडे येण्याचे आवाहन केले आहे.

जीबीएस बाधित क्षेत्रात ज्या प्रमाणे टँकर पॉईंट आहे, तेथे ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून दिली आहे. शहरातील इतर भागातील टँकर पॉईंटवर तपासणी करून पुढील निर्णय घेतला जाईल. - नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाHealthआरोग्य