शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा करून सांगते! अमृता फडणवीसांचं 'त्या' प्रश्नावर मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:23 IST

महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? अमृता फडणवीस म्हणाल्या...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाजा आड झालेली भेट असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेली बैठक यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या भेटीवर भाजपसह इतर आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेतेमंडळींनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण याचवेळी पुण्यात एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी युतीवर सूचक वक्तव्य केले आहे.अमृता फडणवीस या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. फडणवीस म्हणाल्या, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमकुवत आहे. आणि हे सरकार कधी पडेल याचा काही नेम नाही. हे सरकार पडावं असा ध्यास प्रत्येकाला लागला आहे. पण ज्यावेळी हे सरकार पडेल त्यावेळी भाजपा चांगला पर्याय देईल.  

यासंदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेल... 

दिल्लीमध्ये ज्या काही वरिष्ठ नेतेमंडळींमध्ये बैठका आणि भेटीगाठी होत आहे. त्या आजच होत नसून यापूर्वीपासून ते भेटत आले आहे. अचानक भेटले नाहीत. त्यावरून लगेच निष्कर्ष काढणे आणि त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार आहे. तसेच ‘भाजपा चांगला पर्याय देऊ शकते असे ज्यावेळी म्हणता त्यावेळी भाजपा नेमकं कुणाला सोबत जाणार या प्रश्नावर फडणवीस यांनी या संदर्भात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निश्चित सांगेल अशा शब्दात उत्तर दिले. 

महाविकास आघाडी सरकारची आवडणारी गोष्ट कोणती? अमृता फडणवीस म्हणाल्या...

अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्या नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. पूरग्रस्तांसाठी दिलेल्या पॅकेजसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुनही त्यांनी, या पॅकेजमध्ये महावसुली नाही झाली तर बरं, असे म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. अमृता यांच्या या उत्तरानंतर महाविकास आघाडी सरकारमधील कोणती गोष्ट किंवा काम तुम्हाला आवडलं? असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावरही, त्यांनी चांगलाच टोला लगावला. महाविकास आघाडी सरकारमधील हे तिन्ही पक्ष एकत्रपणे एकमेकांची पाठ ज्या पद्धतीने खाजवतात ते मला खूप आवडतं, असे अमृत यांनी म्हटले. 

 

टॅग्स :PuneपुणेAmruta Fadnavisअमृता फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारण