लाचप्रकरणी तलाठी अटकेत

By Admin | Updated: July 3, 2014 05:47 IST2014-07-03T05:47:04+5:302014-07-03T05:47:04+5:30

खांड येथील जमीन दस्तनोंदणीच्या कामासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना खांड येथील गाव कामगार तलाठी दिलीप व्यंकटी राठोड यांना पुणे लाचलुचपत विभागाने बुधवारी मुद्देमालासह पकडले

Talathi Attempted Bribery Case | लाचप्रकरणी तलाठी अटकेत

लाचप्रकरणी तलाठी अटकेत

वडगाव मावळ : खांड येथील जमीन दस्तनोंदणीच्या कामासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना खांड येथील गाव कामगार तलाठी दिलीप व्यंकटी राठोड (वय २८, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) व त्याचा खासगी सहायक गणेश मधुकर लष्करी (३०, रा. वडेश्वर ता. मावळ) यांना पुणे लाचलुचपत विभागाने बुधवारी मुद्देमालासह पकडले. याबाबत सूरज रमेश नायडू (रा. थॉमस कॉलनी, देहुरोड ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्या दी नायडू यांनी आंदर मावळातील खांड येथे १८ गुंठे जमीन खरेदी केली होती. त्याची नोंद करण्यासाठी नायडू ८ मार्चला तलाठी कार्यालयात गेले. त्यावेळी तलाठी राठोड याने नायडू यांना महिनाभर हेलपाटे मारायला लावले. तीन महिन्यानंतरही त्याची नोंद केली नाही. तलाठी राठोड याने नोंदीसाठी २५ हजार रूपयाची मागणी केली.
नायडू यांनी ११ हजार रूपये देण्याचे मान्य केले. तलाठी राठोड याचा खासगी सहायक लष्करी १३ हजार रुपये लाच घेताना मावळ तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पकडले. पुणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस निरीक्षक
अरूण देवकर, एस. एस. साळुंखे पोलीस कर्मचारी दशरथ चिंचकर व जगदिश कस्तुरे यांच्या पथकाने सापळा रचून पकडले. (वार्ताहर)

Web Title: Talathi Attempted Bribery Case