शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोरेगाव भीमाप्रकरणी उपाययोजना करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 1:59 AM

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; नोव्हेंबरमध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे : कोरेगाव भीमा येथे दोन गटांत झालेल्या वादातून निर्माण झालेल्या स्थितीनंतर स्थानिक नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने अद्याप येथील स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येत्या १ जानेवारी २०१९ रोजी कोरेगाव भीमा येथे होणाºया कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व समविचारी संघटनांची जिल्हाधिकाºयांनी संयुक्त बैठक घ्यावी, या मागणीचे निवेदन विविध दलित संघटनांच्या संयुक्त समितीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सोमवारी दिले.कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले. महाराष्ट्राच्या विधिमंडळापासून संसदेपर्यंत यावर चर्चा झाली. दंगलीमध्ये एका तरुणाचा जीव गेला. तसेच, जाळपोळीमध्ये काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. परिसरातील काही नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. पुढील दोन महिन्यांनंतर २ जानेवारी २०१९ रोजी लाखो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच तयारी सुरू करावी, अशी मागणी दलित संघटनांकडून करण्यात आली. या वेळी आयपीआयचे नेते परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, राहुल डंबाळे, विवेक चव्हाण आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच, महाराष्ट्रासह देशभरातून येणाºया आंबेडकरी अनुयायांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली. त्यावर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात बैठक घेऊ, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार