शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

९१ वर्षांच्या आजीचा न्यायासाठी टाहो

By admin | Updated: April 20, 2017 06:36 IST

मागील सहा वर्षांपासून गावातील हक्काच्या घराचा गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने ताबा घेतला आहे. उतारवयात त्यांच्यावर घरासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली

बारामती : मागील सहा वर्षांपासून गावातील हक्काच्या घराचा गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने ताबा घेतला आहे. उतारवयात त्यांच्यावर घरासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली. पंचायत समिती, ग्रामपंचायतीने वारंवार पोलीस प्रशासनाला घराचा ताबा देण्याची विनंती केली. परंतु खाकी वर्दीतील माणुसकी काही जागी होत नाही. त्यामुळे ९१ वर्षांच्या आजीने न्यायासाठी टाहो फोडला आहे. पणदरे (ता. बारामती) येथील शकुंतला फिलोमन दामले या ९१ वर्षांच्या आजी त्यांच्या दोन मुले अशोक, प्रवीण यांच्यासह बारामती पंचायत समितीच्या आवारात न्याय मागण्यासाठी बसून आहेत. जोपर्यंत घराचा ताबा प्रशासन देत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. शकुंतला दामले या अल्पसंख्याक ख्रिश्चन प्रवर्गातील आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. ग्रामपंचायतीकडून घरकुल मिळाले होते. मात्र उपजीविकेसाठी काही दिवस त्यांना बाहेरगावी जावे लागले. यादरम्यान दामले यांच्या घराचा ताबा घेतलेल्या हनुमंत हरिभाऊ चौरे याने तत्कालीन ग्रामसेवकास हाताशी धरून घरनोंदी असलेल्या ग्रामपंचायतीमधील नोंदवहीमध्ये दामले यांच्या नावाची खाडाखोड करून स्वत:चे नाव लावले. अशोक फिलोमन दामले यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत, बारामती पंचायत समितीकडे धाव घेतली. २५ मे २०१५ ला तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी दामले यांच्या बाजूने तपासणी अहवाल दिला. तसेच हनुमंत चौरे यास तत्काळ घर खाली करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही चौरे याने घर खाली न करता अशोक फिलोमन दामले यांना धमकावले. तसेच मी कोणाला घाबरत नाही, कोठे जायचे तिथे जा, असे सांगितले. यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला पणदरे ग्रामपंचायत व बारामती पंचायत समितीने दामले यांना घराचा ताबा मिळवून द्यावा, यासाठी विनंती अर्ज केले. सलग दीड ते दोन वर्षांपासून हे विनंती अर्ज वडगाव पोलीस ठाण्याला मिळत आहेत. परंतु वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचा एकही पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी दामले यांच्याकडे फिरकलादेखील नाही.