स्वातंत्र्यवीर सावरकरही शिक्षेदरम्यान तुरूंगात तुकारामांचे अभंग गात असत: पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 15:47 IST2022-06-14T15:46:38+5:302022-06-14T15:47:32+5:30
PM Narendra Modi Visit Pune : मंगळवारी देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.

स्वातंत्र्यवीर सावरकरही शिक्षेदरम्यान तुरूंगात तुकारामांचे अभंग गात असत: पंतप्रधान
PM Narendra Modi Visit Pune : मंगळवारी देहूत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली होती. “आपली राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आज आपली आहे. म्हणूनच आज जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा भारताच्या विकासाचा पर्याय बनत आहेत, तेव्हा विकास आणि वारसा हे एकत्र पुढे जावे, याची आम्ही खात्री करत आहोत,” असं मोदी यावेळी म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत जेव्हा वीर सावरकर यांना शिक्षा झाली, तेव्हा तुरूंगात ते तुकाराम महाराजांचे अभंग गात असत,” असंही मोदींनी यावेळी सांगितलं.
छत्रपति शिवाजी महाराज जैसे राष्ट्रनायक के जीवन में भी तुकाराम जी जैसे संतों ने बड़ी अहम भूमिका निभाई।
— PMO India (@PMOIndia) June 14, 2022
आज़ादी की लड़ाई में वीर सावरकर जी को जब सजा हुई, तब जेल में वो हथकड़ियों को चिपली जैसा बजाते हुए तुकाराम जी के अभंग गाते थे: PM @narendramodi
हमारी राष्ट्रीय एकता को मजबूत करने के लिए आज ये हमारा दायित्व है कि हम अपनी प्राचीन पहचान और परम्पराओं को चैतन्य रखें।
इसलिए, आज जब आधुनिक टेक्नोलॉजी और इनफ्रास्ट्रक्चर भारत के विकास का पर्याय बन रहे हैं तो हम ये सुनिश्चित कर रहे हैं कि विकास और विरासत दोनों एक साथ आगे बढ़ें: PM— PMO India (@PMOIndia) June 14, 2022
संत तुकाराम महाराजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या 'अभंगां'च्या रूपात अजूनही आहे. या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जे भंग होत नाही, जो शाश्वत आणि प्रासंगिक असते, तोच अभंग असल्याचंही त्यांनी म्हटलं. भारत शाश्वत आहे कारणी ती संतांची भूमी आहे. आज देश सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास यावर चालत आहे. सरकारच्या प्रत्येक योजनांचा लाभ कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मिळत आहे. महिला सबलीकरणासाठीही प्रयत्न केले जातायत. पंढरपूरची वारी ही समानतेचं प्रतिक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.