शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

छोटा गंधर्वांनी अजरामर केलेल्या गीतांचे ‘स्वरराज गान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:14 PM

या कार्यक्रमात काळाच्या पडद्यावर गेलेली काहीशी अप्रसिध्द पण दर्जेदार अशी  ‘प्राणप्रतिष्ठा’,  ‘दिल्लीहून सुटका’ आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील पदांची झलक सादर करण्यात आली.

ठळक मुद्दे‘सौभद्र’ नाटकातील  ‘तुम्हा तो शंकर सुखकर हो’ या नांदीने कार्यक्रमाची सुरूवात

पुणे : दिलरूबा मधुर हा, नच उरत सुखमाधुरी, येतील कधी यदुवीर, प्रिये पहा अशा छोटा गंधर्वांच्या अप्रचलित नाटयपदांच्या सादरीकरणाने रसिकांची सायंकाळ  ‘स्वरमयी’ झाली. निमित्त होते, भरत नाट्य मंदिर येथे रंगलेल्या  ‘स्वरराज गान’ कार्यक्रमाचे. सांस्कृतिक कला अकादमी पुणे या संस्थेतर्फे कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. नाटयसंगीत’ हा श्रोत्यांचा अत्यंत आवडता असा पैलू. छोटा गंधर्वांच्या सांगीतिक कारकिर्दीला उजाळा देणे आणि त्यांच्या विविध शैलीतील संगीताचा सुखद पुन:प्रत्यय श्रोत्यांना देणे हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून अतिशय रंजक पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.  ‘सौभद्र’ नाटकातील  ‘तुम्हा तो शंकर सुखकर हो’ या नांदीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मुकुंदराज गोडबोले, राजश्री ओक, धनश्री कुलकर्णी, ॠषिकेश बोडस या गायकांनी छोटा गंधर्वांच्या नाट्यपदांचा सुरेल नजराणा रसिकांसमोर पेश केला. काळाच्या पडद्यावर गेलेली काहीशी अप्रसिध्द पण दर्जेदार अशी  ‘प्राणप्रतिष्ठा’,  ‘दिल्लीहून सुटका’ आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील पदांची झलक सादर करण्यात आली. अध्यात्मिक मार्गाचे पथिक असलेल्या छोट्या गंधर्वांची लोकप्रिय भक्तीगीतांनीही वातावरणात भक्तीरस जागृत केला.  ‘वागधीश्वरी’या एका अनवट रागातील छोटा गंधर्व रचित बंदिश छोटा गंधर्व यांच्या ज्येष्ठ शिष्या माधुरी ओक यांनी गायली. विश्वनाथ ओक ( हार्मोनिअम), अमित ओक (इलेक्ट्रॉनिक आॅर्गन), माधव मोडक व नरेंद्र साठे ( तबला) यांनी साथसंगत केली. संगीतकार विश्वनाथ ओक यांची संहिता आणि तिचे सादरीकरण ही कार्यक्रमाची अत्यंत जमेची बाजू ठरली.

टॅग्स :Puneपुणे