शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट-कात्रज मार्ग बंदच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 16:31 IST

ताफ्यात पुरेशा बस नसल्याने स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पुणे महानगर परिवहन महांडळाने (पीएमपी) महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे नवीन बस आल्याशिवाय हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वी सुरू झालेल्या निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर सध्या पीएमपीच्या सर्वाधिक २२७ बससध्या स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे काम प्रगतीपथावर

पुणे : ताफ्यात पुरेशा बस नसल्याने स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पुणे महानगर परिवहन महांडळाने (पीएमपी) महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे नवीन बस आल्याशिवाय हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जानेवारी महिन्यात नवीन बस येणार असल्याने तोपर्यंत प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.काही दिवसांपुर्वी सुरू झालेल्या निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर सध्या पीएमपीच्या सर्वाधिक २२७ बस सोडाव्या लागत आहेत. या मार्गासह पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सध्या बीआरटीचे पाच मार्ग सुरू आहेत. पीएमपीकडे बीआरटी मार्गांवरून धावण्यायोग्य सर्व बसचे या मार्गांवर संचलन सुरू आहे. तसेच दैनंदिन ब्रेकडाऊनमुळे काहीवेळा हे नियोजनही कोलमडते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच सध्या स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर हा मार्गही सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत ‘लोकमत’ने दि. २९ आॅगस्ट रोजी ‘स्वारगेट-कात्रज बीआरटी अधांतरी’ या वृत्तातून या मार्गाची स्थिती मांडली होती. त्यावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले आहे.पीएमपी प्रशासनाने याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बीआरटी बसच्या कमतरतेबाबत माहिती दिली आहे. स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग सुरू केल्यास संचलनासाठी पुरेशा बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा मार्ग सुरू करू नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. त्यासाठी नवीन बसेसची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या ‘पीएमपी’कडून नवीन ४०० सीएनजी बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. अद्याप ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. तसेच १५० ई-बसेसची प्रक्रियाही अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस येण्यासाठी नवीन वर्ष उजाडावे लागणार आहे. त्यानंतरही नवीन बीआरटी मार्गावर बस संचलन सुरू होऊ शकते, याबाबत पालिका आयुक्तांना सांगण्यात आले आहे. ------------------निगडी ते दापोडी मार्ग सुरू झाल्याने उपलब्ध बीआरटी बस या मार्गावर सोडण्यात येत आहेत. नवीन मार्ग सुरू झाल्यास संचलनासाठी पुरेशा बस नाहीत. ४०० सीएनजी बस आल्यानंतर हे शक्य होईल. याबाबत पालिका आयुक्तांना कल्पना देण्यात आली आहे.- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेSwargateस्वारगेटkatrajकात्रज