शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट प्रकरण : सगळे आले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मात्र गायबच

By राजू इनामदार | Updated: February 27, 2025 17:08 IST

राज्यमंत्रीही नाहीत: स्वारगेट बसस्थानकाकडे मंत्र्यांचेच दुर्लक्ष

पुणे :स्वारगेट बसस्थानकात बलात्कारासारखे गंभीर प्रकरण घडल्यानंतर पुण्यातील बहुतेकांनी त्याची दखल घेत स्वारगेट बसस्थानकाला तत्काळ भेट दिली. मात्र ज्या खात्याकडे याच नव्हे तर राज्यातील सर्वच बसस्थानकांची जबाबदारी आहे ते परिवहन मंत्री व राज्यमंत्री या घटनेनंतर स्थानकाकडे फिरकलेदेखील नाहीत. राज्यमंत्र्यांच्या तर मतदारसंघातच हे स्थानक आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतून प्रतिक्रिया देत स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी आढावा बैठक घेत आहोत असे जाहीर केले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ पूर्वनियोजित दौऱ्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत पुण्याबाहेर होत्या. त्यांनी दुपारी ४ नंतर या घटनेची दखल घेत पोलिस आयुक्तांना फोन केला व तपासाविषयी सांगितले. मात्र, यापेक्षा त्यांनी तत्काळ बसस्थानकात येऊन तेथील दुरवस्थेची पाहणी करणे अपेक्षित होते असे अन्य राजकीय पक्षांच्याच नाही तर त्यांच्याच पक्षातील अनेकांचे मत आहे.स्वारगेट बसस्थानक शहरातील जुने व मध्यवर्ती बसस्थानक आहे. २४ तासांत तिथून किमान हजार एक गाड्यांची व ५० हजार प्रवाशांची ये-जा होत असते. त्यामुळे स्थानकाच्या व स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानक प्रशासनाची आहे. प्रत्यक्षात मात्र या स्तरावर सगळाच आनंद आहे. स्थानकात मुंबईच्या गाड्या जिथे लागतात, त्याच्या मागे मैदानसदृश स्थानकाचीच रिकामी जागा आहे. तिथे कायम अंधार असतो. स्थानकातील भुरट्या, टपोरी लोकांची ही रात्रीच्या पार्ट्यांची खास जागा आहे.ही घटना घडल्यावर स्थानकाला भेट देणाऱ्या अनेकांच्या लक्षात ही बाब आली. नादुरुस्त गाड्या तिथेच लावून ठेवलेल्या असतात. या गाड्यांना कुलूप लावून त्या बंद करणे ही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत प्राथमिक गोष्ट आहे. मात्र बंद पडलेल्या या गाड्या सताड उघड्या असतात. त्यामुळेच या गाड्यांचा काही समाजकंटकांनी बार केला आहे. आत गाद्या लावून ठेवल्या आहेत. तिथे रिकाम्या बाटल्या, बिड्या, सिगारेटची थोटके, रिकामी पाकिटे पडलेली असतात. गुन्हे करणाऱ्यांची ही सोयीची जागा जणू मोकळी करून दिली आहे. इतकी दुर्लक्षित आहे. तिथे ना स्थानक प्रशासन प्रमुखांची फेरी असते, ना सुरक्षा रक्षकांची.हे सगळे परिवहन मंत्र्यांनी पहायला हवे होते असे प्रवाशांचे मत आहे. सगळे येतात तर मग यांनाच अशी कोणती महत्त्वाची कामे आहेत असा प्रश्न स्थानकांतील अनेक प्रवाशांनी केला. काही राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनीही दोघांपैकी कोणीच कसे इकडे येत नाही, त्यांना घटनेचे गांभीर्य नाही का? ते आले असते तर प्रशासनावर वचक येतो, त्यांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात असे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीpratap sarnaikप्रताप सरनाईकBus DriverबसचालकSwargateस्वारगेटPoliceपोलिसWomenमहिलाswargate bus depotस्वारगेट बसस्थानक